JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धक्कादायक! डॉक्टरांना मूत्राशयात सापडली केबल; मोबाइल चार्जरने हस्तमैथुन केल्याचा प्रताप

धक्कादायक! डॉक्टरांना मूत्राशयात सापडली केबल; मोबाइल चार्जरने हस्तमैथुन केल्याचा प्रताप

डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यानंतर हा हस्तमैथुनाचा (Masturbate) प्रकार असल्याचं समोर आलं. तोपर्यंत ही व्यक्ती आपण चुकून केबल गिळल्याचंच सांगत होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुवाहाटी, 05 जून : लैंगिक सुखासाठी (sexual desire) एखादी व्यक्ती असं काही करू शकते याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. मात्र आसाममधील (Aasam) एका व्यक्तीने प्रत्यक्षात ते केलं आहे. या व्यक्तीने हस्तमैथुनासाठी (Masturbate) मोबाइल चार्जरच्या केबलचा (mobile charger cable) वापर केला. डॉक्टरांनी या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर मूत्राशयात केबल सापडली आणि हा धक्कादायक प्रताप समजला. 30 वर्षांची व्यक्ती पोटदुखीची तक्रार घेऊन आला. या व्यक्तीने आपण चुकून मोबाइल हेडफोनची केबल (mobile headphone cable) गिळल्याचं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या मलाची तपासणी केली, तसंच एन्डोस्कोपीही केली मात्र त्यांना अन्ननलिकेत, पोटात केबल सापडली नाही. शेवटी डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला. त्यावेळी मूत्राशयात मोबाइल चार्जरची केबल असल्याचं दिसलं.

या रुग्णावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. इस्लाम यांनी आपल्या सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. इस्लाम म्हणाले, “30 वर्षांची व्यक्ती ओटीपोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन माझ्याकडे आली. आपण चुकून मोबाईल हेडफोन गिळल्याचं त्या व्यक्तीने सांगितलं. आम्ही त्याच्या अन्ननलिकेची तपासणी केली मात्र त्यात काहीच नव्हतं. ही केबल मूत्राशयात असल्याचं दिसलं”

न्यूज 18 शी बोलताना डॉ. इस्लाम म्हणाले, “या व्यक्तीला लैंगिक सुखासाठी केबल आणि इतर वस्तू पेनिसमध्ये टाकण्याची सवय आहे. हा हस्तमैथुनाचा प्रकार आहे, याला urethral sounding असं म्हणतात. ज्यामध्ये मूत्रमार्गात एखादी वस्तू किंवा द्रव टाकलं जातं. मात्र या व्यक्तीने ठरवल्याप्रमाणे काही झालं नाही उलट ही केबल त्याच्या मूत्राशयात गेली. त्यानंतर पाच दिवसांनी हा पुरुष आमच्याकडे आला आणि आम्हाला केबल गिळल्याचं वारंवार सांगू लागली” हे वाचा -  कोरोना लॉकडाऊनमुळे झालं ब्रेकअप; पुन्हा पॅचअप करायचंय? मग तुमच्यासाठी टीप्स रुग्णाची शस्त्रक्रिया करून केबल शरीराबाहेर काढण्यात आली. रुग्ण आता बरा होत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या