JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळी होणाऱ्या एवढ्याशा चुकीमुळं अ‌ॅसिडिटी सगळा दिवस खराब करते; लवकर बदला सवय

सकाळी होणाऱ्या एवढ्याशा चुकीमुळं अ‌ॅसिडिटी सगळा दिवस खराब करते; लवकर बदला सवय

अनेक लोकांचे आठवड्यातील दोन-तीन दिवस अ‌ॅसिडिटीमुळे खराब जातात. आपल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होत असतं, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 08 मे : भारतातील बरेच लोक अ‌ॅसिडिटी आणि पोटात गॅसच्या समस्येने त्रस्त आहेत. वारंवार होणारे हे त्रास दैनंदिन कामांमध्ये खोडा आणतात, अनेक लोकांचे आठवड्यातील दोन-तीन दिवस खराब जातात. आपल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे असं होत असतं, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. यासाठी आपल्याला अशा सवयी बदलाव्या लागतील ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते आणि अॅसिडिटीचे मोठे (How Can I Reduce Acidity) कारण बनते. सकाळी अशी चूक करू नका - झीन्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला आवडत असेल तर त्यामुळे अॅसिडिटी आणि रिफ्लक्सची समस्या उद्भवते. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास पित्ताच्या रसावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे अ‌ॅसिडिटी शिवाय मळमळण्याच्या त्रासही सुरू होतो. या गोष्टीही टाळा फक्त चहाच नाही तर असे अनेक पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. यामध्ये मसालेदार पदार्थ, गरम कॉफी, जास्त तेल असलेले अन्न, चॉकलेट इ. या गोष्टींपासून दूर राहणे चांगले. अॅसिडिटी टाळण्यासाठी रोज सकाळी काय करावे? तुम्हाला सकाळी चहाशिवाय राहणे शक्य नसेल तर तुम्ही चहामध्ये आले मिसळून पिऊ शकता. त्यामुळे अॅसिडिटीची शक्यता कमी होईल. मात्र, अॅसिडिटी घालवायची असेल तर उपाशी पोटी चहा नकोच. हे वाचा -  कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांची अशी घ्या काळजी; होणार नाही कसलाही त्रास सकाळी लवकर नाश्त्यामध्ये दलियाचा समावेश करा, त्यामुळे पोटात गॅस होत नाही आणि पचनक्रियाही चांगली राहते. सकाळी उकडलेले अंडे खाल्ल्यास पोटाचा त्रास होत नाही. हे वाचा -  सकाळी उठल्याबरोबर कधीही बघायच्या नसतात या गोष्टी; सगळा दिवस जातो खराब हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्या रोज सकाळी खाऊ शकता. मात्र, आम्लपित्त टाळण्यासाठी त्या जास्त तेलात शिजवू नका. जेवल्यानंतर सकाळी फिरायला जा, त्यामुळे अॅसिडिटी होण्याच धोका कमी होतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या