मुंबई 05 सप्टेंबर : अनेक तरुणी कुठेही फिरायला जायचं म्हटलं की घरातील लोकांची किंवा लग्न होऊन जोडीदार मिळण्याची वाट बघतात. फक्त मुलींनी फिरायला जाणं म्हणजेच आजही अनेकींना भीती वाटते. मात्र, फिरायला जाताना तुम्ही सुरक्षित ठिकाणांची निवड केली. तर, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. यासोबतच अशा ठिकाणांची निवड करा जिथे तुम्ही आपल्या मैत्रिणींसोबतच मनसोक्त फिरण्याचा आनंद घेऊ शकाल. अशाच काही ठिकाणांची नावं आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
1.ऋषिकेश अॅडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजेच साहसी खेळ हे फक्त पुरुषांसाठीच असतात असं अजिबात नाही. त्यामुळे मुलीही अशा गोष्टींसाठी एखाद्या खास जागेचा शोध घेत असतील तर ऋषिकेश एक उत्तम पर्याय आहे. राफ्टिंग, बर्फाच्या थंड पाण्यावर तरंगत जाणं, कड्यावरून उडी मारणं, हे सगळं तुमच्यातील एका नवीन स्त्रीला पुन्हा जिवंत करेल. रात्रभर बीच कॅम्प, बोनफायर डान्स, बीच व्हॉलीबॉल या सगळ्या गोष्टींची मजा तुम्हाला इथे घेता येईल. 2. गोवा कॉस्मोपॉलिटन वातावरण आणि अंतहीन समुद्रकिनारे तुमच्या अतिशय साध्या आणि शांत मैत्रिणीलाही तिचा सलवार-कमीज बाजूला ठेवून समुद्रकिनारवरील मजा घेण्यासाठी बीची सनड्रेस घालण्यास भाग पाडेल. पालोलेममध्ये लियोपार्ड पार्टी आणि मापुसा येथील फ्रायडे मार्केटमधील खरेदी तुमचा दिवस खास बनवेल. यानंतर शेवटी तुम्ही स्विमसूट घालून निर्जन अश्वेम बीचवर मजा घ्या. इथे कोणीही तुमच्याकडे पाहायला नसेल. 3. पाँडिचेरी आपण फ्रान्सला सहलीसाठी जाण्याकरता लग्नाची वाट पाहत आहात? असं असेल तर लग्नाची वाट पाहू नका आणि त्याऐवजी पाँडिचेरीतील फ्रेंच क्वार्टरला जा. हे केवळ स्वस्तच नाही तर एक आकर्षक हॉलिडे स्पॉट देखील आहे. मोहक सजावटीची प्रशंसा करत तुम्ही हे सुंदर दृश्य अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेल्या तुमच्या DSLR कॅमेऱ्यात क्लिक करू शकता. बेकरीमध्ये मनसोक्त खा, ऑरोविलमध्ये आराम करा आणि थोडासा बनावट फ्रेंच अॅसेंट घेऊन घरी परत या. 4. कच्छचे रण - पांढरी वाळू असलेलं कच्छचे रण हे जगातील सर्वात प्रेक्षणीय स्थळं आहे. कच्छचे रण गांधीधामपासून 108 किलोमीटर अंतरावर आहे. रणात पोहोचताच आपल्याला रंगांनी भरलेले प्रवेशद्वार दिसेल जे टेन्ट शहरकडे जाते. इथे आपल्याला पारंपारिक नृत्य, संगीत, अन्न, कपडे तसंच हस्तकला, पॅरामोटरिंग, ट्रेकिंग, स्टारगॅझिंग आणि फ्लेमिंगो आढळतील. चांदण्या रात्री या ठिकाणचे सौंदर्य बघण्यासारखे असते. 5. मुंबई हे कदाचित NYC सारखं नसेल, पण ‘आमची मुंबई’ची नाईटलाईफ कोणत्याही तरुणाला आवडेल अशी आहे. वांद्रे आणि कुलाबामध्ये खूप थकवणाऱ्या खरेदीनंतर, पारशी कॅफेमध्ये जेवण, लिओपोल्ड्स येथे अनिवार्य पेय, पूर्ण देसी शैलीत पार्टी करण्याची संधी तुम्हाला इथे मिळेल. मनसोक्त फिरून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला परत जायचं असेल तेव्हा सुरक्षितपणे परत आणण्यासाठी नेहमीच टॅक्सी किंवा ऑटो मिळेल.