कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ही फळं खा
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, बैठं काम, पोषक आहाराऐवजी फास्टफूड किंवा जंकफूडचं सेवन, वाढते ताणतणाव आदी गोष्टींमुळे हृदयविकार आणि डायबेटीससारखे आजार होण्याचे प्रमाण वाढलं आहे. अलीकडच्या काळात कमी वयातच हे आजार होताना दिसतात. हृदयविकारासाठी कोलेस्टेरॉल हा घटक महत्त्वाचा ठरतो. आपल्या शरीरात चांगले आणि घातक कोलेस्टेरॉल असतात. चांगले अर्थात गुड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बॅड अर्थात घातक कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर साहजिकच हृदयविकार होतात. कोलेस्टेरॉल हा रक्तातील मेणासारखा घटक असतो. हा घटक आरोग्यपूर्ण पेशींच्या निर्मितीसाठी पूरक असतो. रक्तात बॅड कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी लागते. यासाठी योग्य आहार गरजेचा असतो. तुम्ही आहारात विशिष्ट फळांचा समावेश केला तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. हाय कोलेस्टेरॉल हा चिंतेचा विषय सध्याच्या काळात हाय कोलेस्टेरॉल हा चिंतेचा विषय बनत आहे. कोलेस्टेरॉल हा हृदयविकारासाठी कारणीभूत मानला जातो. हाय कोलेस्टेरॉलमुळे मळमळ, हाय ब्लड प्रेशर, छातीत जड वाटणं, श्वास घेण्यास त्रास होणं, जास्त प्रमाणात थकवा येणं ही लक्षणं दिसतात. ज्या लोकांनी हाय कोलेस्टेरॉलचा त्रास आहे, त्यांनी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं. आहारात काही फळं आणि भाज्यांचा समावेश केल्यास हाय कोलेस्टेरॉलची समस्या दूर होऊ शकते आणि त्याची पातळी नियंत्रणात राहते. हेही वाचा - Relationship Tips : उत्तम संवादाने नातं होईल अधिक घट्ट, पार्टनरसोबत बोलताना या गोष्टी ठेवा लक्षात कशी होईल कोलेस्टेरॉल पातळी कमी? संत्री, लिंबू, द्राक्षांसारखी आंबट फळं व्हिटॅमिन सीचा स्रोत असतात. ही फळं त्वचा आणि केसांच्या आरोग्यासह बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्याचप्रमाणे सफरचंददेखील कोलेस्टेरॉलची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. कुरकुरीत आणि स्वादिष्ट सफरचंदामुळे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी हितावह ठरते. तसेच यामुळे हृदयाचे आरोग्य ही उत्तम राहते. सफरचंदामुळे एलडीएल अर्थात लो डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. यामुळे हृदयविकार दूर राहतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सीसह अनेक पोषक घटक असतात. टोमॅटो हृदयाच्या आरोग्यासाठी पूरक मानले जातात. टोमॅटोमुळे हाय ब्लड प्रेशर सह कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. पपईत फायबर मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. पपईमुळे एलडीएल अर्थात बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. अॅव्होकॅडो हे फळ कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामुळे हृदय निरोगी राहते आणि स्ट्रोकची जोखीम कमी होते. अॅव्होकॅडोमुळे एलडीएल आणि एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.