JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त 286 रुपयात 4 कोटी रुपयांचं आलिशान घर; कुठे आणि कसं मिळतंय ते पाहा

फक्त 286 रुपयात 4 कोटी रुपयांचं आलिशान घर; कुठे आणि कसं मिळतंय ते पाहा

तुम्हाला विश्वास बसणार नाही. एका टी-शर्टच्या किमतीत घर मिळत आहे.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लंडन, 01 नोव्हेंबर : आपलं आलिशान घर असावं, असं स्वप्न कुणाचं नसतं. पण अशी घरं, लाखो-कोट्यवधीच्या किमतीत मिळतात. पण तुम्हाला कुणी फक्त 286 रुपयात 4 कोटी रुपयाचं घर मिळत असल्याचं सांगितलं तर… विश्वासच बसणार नाही ना… पण एका टी-शर्टच्या किमतीत घर मिळतं आहे ते यूकेमध्ये. एका लॉटरीअंतर्गत हे घर मिळत आहे. यूकेतील डेनिअल ट्वेनफोरने भाऊ जेसन आणि विलसोबत ही लॉटरी स्किम सुरू केली. या लॉटरीत विजेत्याला घर दिलं जात आहे. तब्बल  3.8 कोटी रुपये किमतीचं हे घर आहे. या लॉटरीच्या तिकिटाची किंमत 286 रुपये आहे. म्हणजे 286 रुपयांची लॉटरी खरेदी करून ती लॉटरी जिंकणाऱ्याला कोट्यवधींचं हे आलिशान घर मिळणार आहे. लॉटरी विजेत्याच्या नावाची घोषणा 5 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. ब्रिटनच्या केंटमध्ये हे तीन मजली घर आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असं घर आहे.  या घरात 4 बेडरूम, मोठं किचन, लिव्हिंग रूम, गार्डन आहे. घरातील बऱ्याच वस्तू आधुनिक पद्धतीच्या आहेत. घरात सुंदर असं फर्निचर, चिमनी आहे. हे वाचा -  एक बेट मृत्यूचं! असं बेट जिथे 1 लाख 60 हजार जणांना जिवंत जाळलं, आजही भेट देण्यास आहे बंदी जिथं हे घर आहे तो परिसरही चांगला आहे. घराजवळ चैथम रेल्वे स्टेशन आहे. जिथून सेंट्रल लंडनसाठी ट्रेन जातात. इथून फक्त एका तासात सेंट्रल लंडन पोहोचता येईल. कुटुंबाला राहण्यासाठी हे घर चांगलं आहे, पण इथलं भाडंही चांगलं मिळले. जिथं ही प्रॉपर्टी आहे तिथं दर महिन्याला २ कोटी रुपयांचं भाडं मिळतं. आता या घरासाठी ट्वेनफोर ब्रदर्स 1,55,000 तिकीटं विकतील. जो कुणी या घराचा विजेता असेल त्याला स्टॅम्प ड्युटी आणि लीगल फी द्याी लागेल. लॉटरीचा ड्रॉ 5 नोव्हेंबर रोजी काढला जाईल. त्याच संध्याकाळी विजेत्याच्या नावाचीही घोषणा होईल. हे वाचा -  दोन ‘अडल्ट डॉल’ घेऊन मंदिरात पोहोचला तरुण, यामागचं कारण ऐकून बसेल धक्का द मिररच्या रिपोर्टनुसार ट्वेनफोर ब्रदर्सने या लॉटरीची सुरुवात लॉकडाऊनमध्ये रेली होती. तेव्हा त्यांनी स्वतःचं घर विकलं होतं.. त्यांनी याआधीही लॉटरीअंतर्गत अशा 9 प्रॉपर्टी विजेत्यांना सुपूर्द केल्या आहेत. ब्रिस्‍टल सिटी सेंटरनध्येच एकाच वेळी प्रत्येकी पावणे पाच कोटीचे 3 अपार्टमेन्ट लॉटरी विजेत्यांना दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या