JOIN US
मराठी बातम्या / भारत-चीन / भारताविरुद्ध सगळ्यात मोठा कट, मिसाइल साइट्स तयार करतंय चीन; सॅटेलाइट PHOTO आले समोर

भारताविरुद्ध सगळ्यात मोठा कट, मिसाइल साइट्स तयार करतंय चीन; सॅटेलाइट PHOTO आले समोर

या फोटोमध्ये दोन साइट्स दिसत आहेत, जिथं चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी ग्राउंड-टू-एअर क्षेपणास्त्र साइट तयार करत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : भारत आणि चीन (India China Faceoff) यांच्यात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC ) तणाव कायम आहे. दरम्यान, या सगळ्यात चीन भारताविरुद्ध एक मोठा रचत असल्याचे समोर आले आहे. काही सॅटेलाइट फोटोवरून असा दावा केला जात आहे की, चीन डोकलाम आणि नाकू ला येथे क्षेपणास्त्र साइट्स बनवत आहे. यामध्ये भारत आणि चीनमधील सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचाही समावेश आहे. ओपन सोसर्स इंटेलिजन्स अॅनालिस्टनं आपल्या ट्विटर हँडल @detresfaवर सॅटेलाइट फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये दोन साइट्स दिसत आहेत, जिथं चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी ग्राउंड-टू-एअर क्षेपणास्त्र साइट तयार करत आहेत. अॅनालिस्टनं हा फोटो ट्वीट करत, सिमटॅक (आणखी एक विश्लेषक) यांच्यासह चीन, भूतान आणि भारताच्या यांच्या ट्रायजंक्शनवर डोकलाम भागात मिळालेल्या पुराव्यानुसार PLA हवाई संरक्षण पायाभूत सुविधा तयार करत आहे. हे ठिकाण भारत-चीन यांच्यात झालेल्या चकमकीच्या ठिकाणापासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर आहे. वाचा- Boat च्या वस्तुंवर मेड इन चायनाच्या ऐवजी Made In PRC? काय आहे हा प्रकार

वाचा- सीमेवर चीनची प्रत्येक युक्ती होईल अपयशी! 7 लष्करी हवाई अड्ड्यांवर भारताची नजर भारतचं सी-17 ग्लोबमास्टर 3 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट सज्ज चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानेही तयारी सुरू केली आहे. पूर्व लद्दाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यातील वाढती तणाव लक्षात घेता भारतीय हवाई दलाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) बाजूने सर्व प्रमुख केंद्रांवर फ्रंटलाइन सैनिक, हेलिकॉप्टर आणि एअरक्राफ्ट तैनात केले आहे. हवाई दलाने सी-17 ग्लोबमास्टर 3 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, सी -130 जे सुपर हरक्यूलिसचा फ्लीट बसविला आहे. वाचा- भारताचा चीनला आणखी मोठा दणका, 44 ट्रेन्सचं टेंडर रद्द एलयूशिन-77 फ्लीट देखील वापरत आहे भारत आणि चीनमध्ये 3,500 कि.मी. वास्तविक नियंत्रण रेषेवर वायुसेने आपल्या एलयूशिन-77 फ्लीट वापर विविध फॉरवर्ड झोनमध्ये नेण्यासाठी केला आहे. ते म्हणाले की वायुसेनेने लेखा आणि श्रीनगरसह अनेक प्रमुख एअर स्टेशनवर अगोदर सुखोई 30 एमकेआय, जेग्वार, मिरज 2000 विमाने तैनात केली आहेत. हवाई दलाने अनेक आगाऊ ठिकाणी सैन्य वाहतूक करण्यासाठी अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टरही तैनात केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या