JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / झोपेत कोणताच आवाज ऐकू येत नाही, असं का? जाणून घ्या झोपेसंबंधी महत्वाच्या गोष्टी

झोपेत कोणताच आवाज ऐकू येत नाही, असं का? जाणून घ्या झोपेसंबंधी महत्वाच्या गोष्टी

तुम्हाला रामायणातील कुंभकर्ण आठवतो? वर्षातील सहा महिने तो झोपून असायचा. रामायणावरील टीव्ही मालिकेत तुम्ही पाहिलं असेल, की या कुंभकर्णाला झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या कानापाशी ढोल-नगारे वाजवण्याले जायचे. मात्र, तरीही तो पट्कन झोपेतून उठायचा नाही. खऱ्या आयुष्यातही कुंभकर्णाचेच वंशज वाटावेत असे कित्येक लोक तुम्ही पाहिले असतील.

जाहिरात

1 उत्तम पुस्तके वाचा किंवा हलके संगीत ऐका - ऑफिसचे काम, तेथील वाद, राजकारण या गोष्टींचे तुमच्या मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. कार्यालयीन वेळेनंतर ते प्रकरण बंद करून टाका. कार्यालयीन बाबींवर विचारमंथन करण्याऐवजी वाचनाची सवय लावा. झोपेच्या 1-2 तास आधी पुस्तके वाचा. प्रेरणादायी किंवा हलक्या-फुलक्या कथा आपल्या हृदयाला आणि मनाला आराम देतात. झोपण्यापूर्वी सुखदायक संगीत ऐकणे देखील फायदेशीर ठरते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून-   तुम्हाला रामायणातील कुंभकर्ण आठवतो? वर्षातील सहा महिने तो झोपून असायचा. रामायणावरील टीव्ही मालिकेत तुम्ही पाहिलं असेल, की या कुंभकर्णाला झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या कानापाशी ढोल-नगारे वाजवण्याले जायचे. मात्र, तरीही तो पट्कन झोपेतून उठायचा नाही. खऱ्या आयुष्यातही कुंभकर्णाचेच वंशज वाटावेत असे कित्येक लोक तुम्ही पाहिले असतील. बाहेर कितीही आवाज, दंगा सुरू असला तरी यांची झोप आजिबात मोडत (People who can sleep in noise) नाही. तुम्हालाही कितीतरी वेळा हा अनुभव आला असेलच. मात्र, कधी विचार केलाय की झोपेत आपल्याला का ऐकू येत नाही? शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या इतर जाणीवा तात्पुरत्या स्वरुपात बंद (Why we cannot hear during sleep) झालेल्या असतात. मात्र, आपला मेंदू सतत कार्यरत असतो. मग तरीही आपल्याला काही ऐकू का येत नाही? याच्यामागं खरंतर आपल्या मेंदूचीच किमया आहे. आपला मेंदूच ठरवतो, की कोणत्या आवाजाने आपल्याला उठायचं आहे, आणि कोणत्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं आहे. दी कन्व्हर्सेशन वेबसाईटने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.   मेंदू ठरवतो कोणता आवाज महत्त्वाचा साधारणपणे तुम्ही झोपेत असताना बाहेर अगदी मोठा आवाज झाला, तर तुमचा मेंदू त्यावर प्रतिक्रिया देऊन तुम्हाला झोपेतून उठवतो. मात्र, तुलनेने लहान असलेले आवाज आपली झोपमोड करू शकत नाहीत. कोणते आवाज महत्त्वाचे आहेत, आणि कोणते नाहीत ते आपल्या मेंदूला (Our brain knows which sound is Important when we’re sleeping) बरोबर माहिती असतं. त्यामुळेच नेहमीच्या आवाजांपेक्षा वेगळा आणि मोठा आवाज आला, की खबरदारी म्हणून मेंदू आपल्याला झोपेतून उठवतो. आपल्या मेंदूमध्ये हे सेटिंग अगदी आदिम काळापासून आहे. यामुळेच आदिम काळातील लोक जेव्हा जंगलात झोपी जायचे, तेव्हा जंगली जनावरांच्या आवाजांनी वेळेवर जाग येऊन ते स्वतःचा त्या प्राण्यांपासून बचाव करू शकत होते.

तुमचं नाव पुकारताच येते जाग समजा तुम्ही झोपलेले आहात, आणि तुमच्या आजूबाजूला बोलत असलेल्या लोकांनी तुमचे नाव घेतले, तर तुम्हाला बरोबर जाग (We wake up from sleep when we hear our Name) येते. याला कारण म्हणजे, तुमचा मेंदू तुमचं नाव ऐकून त्याला बरोबर प्रतिक्रिया देतो. दुसऱ्या कोणा व्यक्तीबाबत चर्चा सुरू असेल, तर मात्र मेंदू त्याकडे दुर्लक्ष करतो. **(हे वाचा:** Superfood : बदाम दुधाचे फायदे वाचून थक्क व्हाल; मिळते उत्तम आरोग्य आणि सौंदर्य ) स्लीप सायकलदेखील आहे महत्त्वाची बऱ्याचवेळा रात्री अगदी छोट्याशा आवाजानेही तुमची झोपमोड होते. याला कारण आहे स्लीप सायकल. आपण एका रात्रीत झोपेचे सुमारे सहा टप्पे (We experience 6 Sleep Cycles in one night) अनुभवतो. काही टप्प्यांमध्ये (Sleep Cycle) आपली झोप अगदी गाढ असते, तर काही टप्प्यांमध्ये अगदीच हलकी. झोपताना सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आपली झोप अगदी गाढ असते. मात्र, मध्यरात्रीनंतर काही वेळाने ही झोप हलकी होण्यास सुरुवात होते. या हलक्या झोपेच्या टप्प्यामध्ये अगदी छोटासा आवाज झाल्यावरही आपली झोप मोडू शकते. जर आपल्याला झोपेत कसलेच आवाज ऐकू आले नाहीत, तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तसंच, जर प्रत्येक वेळी थोडासा आवाज झाल्याने आपल्याला जाग येत असेल, तर आपण कधीच झोपू शकलो नसतो. आवाज ओळखण्याची, आणि गरजेचेच आवाज आपल्यापर्यंत पोहोचू देण्याची मेंदूची ही कलाच आपल्याला चांगली झोप घेण्यासाठी फायद्याची ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या