JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे 80% महिलांना समजतच नाही, या 3 कारणांमुळे वाढतो धोका

गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचे 80% महिलांना समजतच नाही, या 3 कारणांमुळे वाढतो धोका

गर्भाशयाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त वयानंतर गर्भधारणा होणे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जीवनशैली आणि आहारातील बदलांव्यतिरिक्त, वयाच्या 35 नंतर गर्भधारणेमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांत गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अंडाशयाचा कर्करोग हा स्त्रियांमधील एक असा आजार आहे, जो अनुवांशिक देखील असू शकतो. हा कॅन्सर इतका झपाट्याने वाढतो की अनेक वेळा त्याची लक्षणे शेवटच्या टप्प्यात दिसतात. गर्भाशयाच्या कर्करोगादरम्यान, पोट फुगणे, लघवीमध्ये जळजळ, भूक न लागणे, अनियमित मासिक पाळी आणि वजन कमी होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भाशयाचा कर्करोग अनेक कारणांमुळे होऊ शकतो. ओव्हेरियन कॅन्सर श्रोणी आणि ओटीपोटात पसरत नाही तोपर्यंत तो आढळून येत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात यशस्वीपणे उपचार केले जाण्याची शक्यता जास्त आहे. 80 टक्के महिलांना या आजाराविषयी दीर्घकाळ माहिती मिळत नाही, ज्यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. गर्भाशयाचा कर्करोग काय आहे - ओवेरियन कर्करोगाला गर्भाशयाचा कर्करोग असेही म्हणतात. एव्हरी डे हेल्थच्या माहितीनुसार, या कॅन्सरमध्ये अंडाशयात अनेक लहान-मोठे सिस्ट तयार होतात, जे हळूहळू ट्यूमरचे रूप घेतात. हे सिस्ट स्त्रीला गर्भधारणेपासूनही रोखतात. कधीकधी ही गाठ शरीराच्या इतर भागातही पसरते. गर्भाशयाच्या कर्करोगावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. 35 नंतर गर्भधारणा - गर्भाशयाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त वयानंतर गर्भधारणा होणे. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जीवनशैली आणि आहारातील बदलांव्यतिरिक्त, वयाच्या 35 नंतर गर्भधारणेमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. मोठ्या वयात गर्भधारणेमुळे गर्भाशयाच्या संसर्गाचा धोका वाढतो, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. हे वाचा -  तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय जास्त वजन असणे - अंडाशयाचा कर्करोग जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे देखील होऊ शकतो. ज्या महिलांचे बॉडी मास इंडेक्स 30 पेक्षा जास्त आहे त्यांना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. लठ्ठ महिलांची शारीरिक हालचाल खूप कमी असते, त्यामुळे मासिक पाळीत समस्या उद्भवू शकतात. मासिक पाळीच्या समस्यांमुळे सिस्ट तयार होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढतो.

प्रजनन उपचारांचा वापर - ज्या स्त्रियांना गर्भधारणा होण्यास त्रास होतो त्यांना प्रजनन उपचारांचा अवलंब करावा लागतो. प्रजनन उपचार म्हणजेच IVF बॉर्डर लाइन किंवा लो मालिंगनेंट ट्यूमरचा धोका वाढू शकतो. प्रजनन उपचारादरम्यान घेतलेली औषधे शरीराला हानी पोहोचवू शकतात. ही औषधे गर्भाशयात किंवा योनीमध्ये सिस्ट तयार करण्यास मदत करू शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेणे हानिकारक ठरू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या