मुंबई, 18 ऑक्टोबर : कॉफी हे वर्षानुवर्षे जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय पेय आहे. कॉफी चवीला उत्कृष्ट असते आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. योग्य पद्धतीने कॉफीचे सेवन केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बहुतेक लोक एनर्जी मिळविण्यासाठी कॉफीचे सेवन करतात, परंतु चुकीच्या वेळी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते तसेच रक्तदाब वाढू शकतो. बर्याच लोकांना कॉफी पिण्याची सवय असते आणि अशा लोकांना एक कप कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात करता येत नाही. पण, डॉक्टर जास्त कॉफी पिण्यास मनाई करतात, म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्थ टिप्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमची कॉफी हेल्दी बनू (Tips to make Coffee Healthy) शकते. या सुपर टिप्स रोजच्या कॉफीला हेल्दी बनवतील - कॉफी शुगर फ्री ठेवा - हेल्थ लाईनच्या मते, कॉफी पिण्यासाठी आरोग्यदायी पेय असू शकते, परंतु त्यात साखरेचा वापर केल्यामुळे ती मधुमेह आणि लठ्ठपणासारखे अनेक आजार वाढवू शकते. तुमची कॉफी हेल्दी बनवण्यासाठी, ती साखरमुक्त ठेवा. जर तुम्ही फिकट कॉफी पिऊ शकत नसाल तर साखरेऐवजी गूळ किंवा नॅचरल स्वीटनर वापरू शकता. कॉफी पिण्याची वेळ - कॉफी हा नैसर्गिक कॅफिनचा उत्तम स्रोत आहे. कॉफी शरीरातील ऊर्जा आणि आनंदी संप्रेरकांसाठी चांगली असते, म्हणूनच कॉफीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, चुकीच्या वेळी कॉफीचे सेवन केल्याने तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री कॉफीचे सेवन करू नका. हे वाचा - तुमचेही केस अकाली पांढरे झालेत? ही असू शकतात कारणं, वेळीच घ्या काळजी कॉफीमध्ये दालचिनी घाला - कॉफीमध्ये दालचिनी टाकून कॉफीची चव दुप्पट करता येते. दालचिनी मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स सारख्या समस्यांना प्रतिबंध करते. कॉफीमध्ये चिमूटभर दालचिनी मिसळून प्यायल्याने आरोग्य सुधारते आणि कॉफीची चवही वाढू शकते. हे वाचा - फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैदयकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)