मुंबई, 06 ऑक्टोबर : पालक खाण्याचे फायदे जवळपास सर्वांनाच माहीत झाले आहेत. मात्र, आजकाल पालक सेंद्रिय आणि योग्य दर्जाचा मिळणे खूप कठीण आहे, म्हणूनच तुम्ही स्वस्त ताजा आणि सेंद्रिय पालक मिळण्यासाठी पालकाची रोपे घरी सहज तयार करू शकता. पालक एक आरोग्यदायी हिरवी वनस्पती आहे, जी स्वादिष्ट तसेच पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. पालकापासून बनवलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर असतात. बाजारात मिळणाऱ्या पालकाच्या पौष्टिकतेवर फारसा विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. कारण, ती शिळी असते आणि अनेक औषध प्रक्रिया करून ती आपल्याला मिळते. यासाठी घरीच पालक पिकवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून (Tips to Plant Spinach at Home) घेऊया. घरी पालक वाढवण्यासाठी या सोप्या टिप्स: चांगली माती निवडा - कोणतीही वनस्पती वाढवण्यासाठी माती सुपीक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. आपण कोणत्याही बागेतून किंवा सुपीक शेतातून माती घेऊ शकता. एखाद्या खड्यात पाण्याने वाहून आलेली माती मिळाली तर उत्तम ठरेल. बियाणे पेरण्यापूर्वी जमिनीत एक ते दोन दिवस सूर्यप्रकाश व पाणी टाकावे, असे केल्याने जमीन सुपीक होते आणि त्यात असलेले जीवाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतात. लागवड करण्यासाठी योग्य जागा : पालकाचे रोप घरात-बाल्कनीत कुठेही लावता येते, परंतु पालकाचे रोप थेट आणि कडक सूर्यप्रकाशात लावू नये हे लक्षात ठेवावे. बाग, मोकळी जागा उपलब्द असल्यास अधिक चांगले होईल. नैसर्गिक खत वापरा: बियाणे पेरल्यानंतर एक दिवस आपण त्यात नैसर्गिक खत घालू शकता. नैसर्गिक खत म्हणून तुम्ही शेणखत, कुजलेली फळे आणि वाळलेल्या फळांच्या सालीपासून बनवलेली पावडर देखील घालू शकता. हे वाचा - फिजिकल रिलेशन हे Cervical cancer चं मोठं कारण; दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू पाणी आणि सूर्यप्रकाशाची विशेष काळजी घ्या: पालक वनस्पतीला थेट आणि कडक सूर्यप्रकाशाची गरज नसते. वनस्पती अशा ठिकाणी ठेवा जिथे अधूनमधून हलका सूर्यप्रकाश असेल, तीव्र सूर्यप्रकाशामुळे रोप मरू शकते आणि पाण्याचे प्रमाण देखील लक्षात ठेवा, दिवसातून एकदा पाणी देणे पुरेसे आहे. हे वाचा - बद्धकोष्ठतेमुळे राहता त्रस्त? रात्री दुधासोबत प्या हा पदार्थ, त्रास होईल दूर (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)