JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / मेंदूसंबंधी आजार दूर करण्यासाठी होणार गणिताची मदत;IIT वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध

मेंदूसंबंधी आजार दूर करण्यासाठी होणार गणिताची मदत;IIT वैज्ञानिकांनी लावला मोठा शोध

मेंदूशीसंबंधित आजारांवर (Brain Diseases) उपचार करण्यासाठी आता चक्क गणिताची मदत घेतली जाणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,23 डिसेंबर-    मेंदूशीसंबंधित आजारांवर  (Brain Diseases)  उपचार करण्यासाठी आता चक्क गणिताची मदत घेतली जाणार आहे. आयआयटी मंडीमध्ये  (IIT )  असणारे वैज्ञानिक शुभजित राय चौधरी   (Dr. Shubhajit Roy Chowdhury)  यांनी एक ट्रान्सक्रॅनिअल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन मॉडेल  (transcranial electrical stimulation model)  तयार केले आहे. या मॅथेमॅटिकल मॉडेलच्या (Mathematical Model) मदतीने मेंदूवर उपचार करण्यात येणार आहेत. ब्रेन स्टिम्युलेशन जर्नलमध्ये (Brain Stimulation Journal) हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनात नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरमधील   (National Brain Research Center)   डॉ. याशिका अरोरा (Dr. Yashika Arora) आणि अमेरिकेतील बफेलो विद्यापीठातील (University of buffalo) डॉ. अनिर्बान दत्ता यांनीदेखील आपले योगदान दिले आहे. डॉ. शुभजित यांनी सांगितले, की ट्रान्सक्रॅनिअल इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन हे नॉन-इन्वेजिव ब्रेन स्टिम्युलेशन मॉडेल आहे. यात रुग्णाच्या डोक्यावर इलेक्ट्रोड्स लावून त्यांच्या मदतीने ब्रेन मॅपिंग करण्यात येते. यासाठी रुग्णाच्या मेंदूच्या काही भागात वीज प्रवाहित केली जाते, ज्याच्या मदतीने मेंदूचा अभ्यास आणि उपचार शक्य आहे. पहिल्या शतकातील संकल्पनेवर आधारित शोध इसवी सनानंतर पहिल्या शतकात रोमन वैद्य स्क्रिबोनियस लार्गस याने सम्राटाची डोकेदुखी कमी करण्यासाठी अजब उपाय केला होता. लार्गसने सम्राटाच्या डोक्यावर ब्लॅक टारपीडो हा वीजेचा शॉक देणारा मासा गुंडाळला होता. पुढे अठराव्या शतकात वीजेचा शोध लागल्यानंतर डोकेदुखी आणि इतर न्युरोलॉजिकल उपचारांसाठी पोर्टेबल इलेक्ट्रोस्टिम्युलेशन उपकरणं डिझाईन केली गेली होती; अशी माहिती डॉ. राय चौधरी यांनी दिली. यातूनच आपल्याला हे उपकरण बनवण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अशाप्रकारे घेतली गणिताची मदत डॉ. शुभजित यांनी सांगितले, “हे मशीन तयार करण्यासाठी आम्ही चार डब्ब्यांसोबत न्यूरोव्हॅस्क्युलर युनिटच्या एका विस्तृत अशा मॅथेमॅटिकल मॉडेलचे अनुकरण केलं. याला सिनेप्टिक स्पेर, अस्ट्रॉईड स्पेस, पेरीव्हॅस्क्युलर स्पेस आणि आर्टेरियल स्मथ मसल स्पेस म्हणून ओळखलं जातं. यात करंट प्रवाहित करुन ब्लड व्हेसलमध्ये होणाऱ्या बदलाचं आम्ही विश्लेषण केलं.” ते पुढे म्हणाले, “मॅथेमॅटिकल मॉडेलमध्ये (mathematical model) चार नेस्टेड एनव्हीयू कंपार्टमेंटल पाथ-वेसाठी (nested NVU compartmental pathway) इलेक्ट्रिक फील्ड स्टिम्युलेशन करण्याची गरज होती. यासाठी वेगवेगळ्या फ्रीक्वेन्सीच्या अप्लिकेशन्सची मदत घेण्यात आली, आणि या फ्रीक्वेन्सींचा (0.1 हर्ट्ज ते 10 हर्ट्ज) ब्लड व्हेसल्सच्या व्यासावर (blood vessel diameter) काय परिणाम होतो, त्यामुळे काय बदल होतो याचा अभ्यास करण्यात आला.” विविध उपचारांमध्ये होणार मदत या शोधामुळे मेंदूला झालेली जखम, हलक्या स्वरुपातील संज्ञानात्मक हानी (Mild cognitive impairment), न्यूरोसायकिअटिक आजार अशा बऱ्याच गोष्टींच्या उपचारांसाठी मदत मिळणार आहे. ब्रेन मॅपिंग ही प्रक्रिया याआधीपासून अस्तित्वात आहे, आणि तिचा वापरही करण्यात येतो आहे. मात्र, या मॅथेमॅटिकल मॉडेलच्या मदतीने ही प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या