JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / तुम्ही जितके तणावात राहाल; तितके जोडीदाराचे दोष मोजत बसाल, वाद होतील - संशोधन

तुम्ही जितके तणावात राहाल; तितके जोडीदाराचे दोष मोजत बसाल, वाद होतील - संशोधन

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. कामाचा ताण किंवा दैनंदिन जीवनातील तणाव तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नकारात्मक वागणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : कदाचित अनेक जणांना हे माहीत नसेल की, जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या चुका किंवा सवयींवर जास्त लक्ष केंद्रित करता. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. कामाचा ताण किंवा दैनंदिन जीवनातील तणाव तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नकारात्मक वागणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करू शकतो. जेव्हा तुम्ही तणावाखाली असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे छोटे-छोटे दोष मोजू लागता. संशोधनानुसार, जेव्हा आपलं एखादं काम नीट होत नाही, आपलं मूल आजारी असतं किंवा तुमची ट्रेन, फ्लाइट चुकते, इ. तेव्हा अशा घटनांमुळे व्यक्तीच्या आत तणाव निर्माण होतो. जेव्हा तुम्हाला अशा घटनांना सामोरे जावे लागते तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला (पार्टनर) दोष देऊ लागता. संशोधन काय म्हणते? संशोधनानुसार, तणावाचा अनुभव घेतल्याने आपण आपल्या जोडीदाराच्या नकारात्मक वागणुकीवर अधिक लक्ष केंद्रित करतो. जेव्हा तणाव असतो तेव्हा जोडीदाराबद्दलची चीड वाढते. या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी 79 नवविवाहित जोडप्यांचे सर्वेक्षण केले. सहभागींना 10 दिवसांच्या कालावधीत दररोज रात्री एक प्रश्नावली भरण्यास सांगितले होते. यामध्ये प्रत्येकाला दिवसभरात अनुभवलेल्या तणावपूर्ण घटना तसेच आपल्या जोडीदारासोबत संभाषण करताना ते कसे वागले आणि कसा वेळ घालवला याची नोंद घेण्यास सांगण्यात आले. हे वाचा -  ‘एंझायटी अ‍ॅटॅक’ का येतो?; जाणून घ्या त्याची कारणं, लक्षणं आणि उपचार संशोधनात काय आढळले? शेवटी संशोधकांना असे आढळून आले की, ज्यांनी सर्वात तणावपूर्ण परिस्थिती अनुभवली त्यांच्यामध्ये त्यांच्या जोडीदाराच्या नकारात्मक वर्तनावर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती वाढली. तणावात राहिलेल्या लोकांनी त्यांच्या जोडीदाराने दिलेली वचने मोडणे, राग येणे, अधीर होणे किंवा टीका करणे यासारख्या नकारात्मक वर्तनावर अधिक लक्ष केंद्रित केले. मात्र, संशोधकांचे असेही म्हणणे आहे की, एखाद्या जोडीदाराला तणावपूर्ण दिवस किंवा तणावामुळे त्यांच्या जोडीदाराकडून त्यांच्या नकारात्मक वागणुकीचे समर्थन करणे पुरेसे नाही. संशोधनातून असे दिसून आले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अनेक दिवस धकाधकीचे जीवन जगत असते किंवा अशा परिस्थितींना तोंड देत असते, तेव्हा त्याच्यामध्ये असे बदल मोठ्या प्रमाणात जन्माला येतात. जर हे एखाद्याच्या बाबतीत घडले तर त्याचा परिणाम नातेसंबंधावरही होऊ शकतो. हे वाचा -  काय येतो जिममध्ये हार्ट अटॅक? सलमानच्या बॉडीगार्डचाही यामुळेच मृत्यू अभ्यासाच्या प्रमुख लेखिका, ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठाच्या डॉ. लिसा नेफ म्हणतात की, तणावामुळे जोडप्याचे लक्ष त्यांच्या जोडीदाराच्या गैरवर्तनाकडे वळले तर त्याचा परिणाम नातेसंबंधावर होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत अनेक वर्षांपासून विवाहित असलेल्या अशा जोडप्यांमध्ये तणावाचे घातक परिणाम अधिक दृढ होतील की नाही, याचा शोध घेण्याची नितांत गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या