मुंबई, 01 नोव्हेंबर : पूर्वी असे मानले जात होते की, वृद्ध किंवा प्रौढांना या आजारांचा सर्वाधिक धोका असतो, परंतु आता तरुणही मोठ्या प्रमाणात याला बळी पडत आहेत. एक मोठी गोष्ट अशी आहे की, अनेक लोकांना हृदयविकाराचा झटका आणि त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती नसते. इतर लक्षणांसोबत हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे घाम येणं. तुम्ही म्हणाल, घाम तर आपल्याला इतरवेळीही येतो. मात्र आज माही तुम्हाला सांगणार आहोत की, हार्ट अटक येण्याची शक्यता असताना शरीराच्या कोणत्या भागातून जास्त घाम येतो. हल्ली आपली जीवनशैली खूप व्यस्त आणि तणावपूर्ण झाली आहे. काम घरून असो किंवा ऑफिसला जाऊन करण्याचे असो. कामातील वाढत तणाव कोणासाठीही कमी झालेला नाही आणि यामुळे सध्या लोकांमध्ये हार्ट अटॅकचे आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. हृदयविकारामुळे तरुणांनाही जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे हार्ट अटॅकची लक्षणे तुम्हाला माहिती असायला हवीत.
बिर्याणीतल्या मसाल्यांमुळे पुरुषांचा सेक्स ड्राइव्ह खरंच कमी होतोय का?हार्ट अटॅकची मुख्य लक्षणे - छातीत अचानक दुखणे - जबड्यापर्यंत छातीत दुखणे - छाती जड झाल्यासारखे वाटते - अचानक हृदयाचे ठोके वेगवान होणे - दम लागणे - अचानक जास्त घाम येणे - थकवा, ऊर्जा कमी होणे - चक्कर येणे
हार्ट अटॅकपूर्वी शरीराच्या या भागातून येतो घाम इतरवेळी व्यायामानंतर, उन्हामध्ये किंवा शारीरिक कष्टानंतर आपल्याला हातांच्या खाली आणि पाठीवर जास्त घाम येतो. मात्र जेव्हा आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तेव्हा आपला चेहरा, मान आणि कपाळावर जास्त घाम येतो. यासोबतच तळहात थंड पडणे आणि त्याला घाम येणे हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी घाम का येतो? झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरातून घाम येणे यामागे शास्त्रीय कारण आहे. अशावेळी कोणत्याही ऋतूमध्ये घाम येऊ शकतो. असे घडते कारण, जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये प्लेक तयार होतो आणि ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीर घाम सोडते. फिट आणि तंदुरुस्त सेलिब्रिटींना कसा काय हार्ट अटॅक येतो? सर्वांनीच या गोष्टींची काळजी घ्यावी हृदयरोगाची प्रमुख कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव, झोपेची कमी वेळ यासारख्या काही कारणांमुळे तरुणांना हृदयविकाराचा झटका आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. हे टाळण्यासाठी त्यांना धूम्रपान आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल. त्याचबरोबर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करावा लागेल आणि तणावाचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करावे लागेल. याशिवाय दररोज किमान ४ किलोमीटर चालावे. दररोज शारीरिक मेहनत करणे खूप महत्वाचे आहे.