JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / भरभर खाण्याची सवय असेल तर लगेच बदला, अनेक आजारांना आहे निमंत्रण!

भरभर खाण्याची सवय असेल तर लगेच बदला, अनेक आजारांना आहे निमंत्रण!

अन्न (Food) 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. मात्र, बदलत्या काळानुसार आपण हा नियम विसरतो

जाहिरात

जास्त खाणंही टाळा - तुम्ही तुमच्या भुकेच्या गरजेहून जास्त खात असाल तरीही तुम्हाला गॅस होऊ शकतो. गरजेतून जास्त जेवाल तर ते पचायला वेळ लागतो. त्यातून पोटात गॅस तयार होतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून : अन्न (Food) 32 वेळा चावून खाल्लं पाहिजे, असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं. लहानपणी आपण घरातल्या मोठ्यांचं म्हणणं बऱ्यापैकी ऐकातो. मात्र, आता बदलत्या काळानुसार आपण हा नियम विसरतो आणि भरभर जेवण्याची सवय  लागते. तुम्हाला देखील ही सवय लागली असेल तर ती तातडीनं बदलणे आवश्यक आहे.   पोटाचे विकार होण्यामागे जेवण नीट चावून न खाणं, हे एक महत्त्वाचं कारण आहे. अन्न चावताना त्यात आपल्या तोंडातील लाळ मिसळते, त्यामुळे ते अन्न सहज पचवता येतं हे आहे. अन्न नीट न चावता आपण पटकन गिळलं, तर त्याचा पचनक्रियेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे अन्न नेहमीच चावून खायला हवं. आज आपण अन्न नीट चावून न खाण्याचं नुकसान आणि अन्न चावून खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. ‘झी न्यूज’ने  या संदर्भातील वृत्त दिलंय. अन्न चावून न खाण्यानं होणारं नुकसान - जर तुम्ही अन्न नीट चावून खाल्लं नाही तर पचनाच्या समस्या (Digestion Issue) उद्भवू शकतात. - अन्न नीट न चावून खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्त्वं मिळत नाहीत. - अन्न पूर्णपणे चावलं नसेल तर आंबट ढेकर येते आणि आपली चिडचिड होऊ शकते. - अन्न न चावल्यास पोटात जळजळ आणि गॅसची समस्यादेखील होऊ शकते. - अन्न नीट चावून न खाल्ल्यास पोटातील अवयवांना सूज येऊ शकते. - जेवण नीट न चावून खाल्ल्यास डोकेदुखी आणि मळमळ होऊ शकते. - अन्न नीट चावून न खाल्ल्यास डायरिया, त्वचेच्या समस्या (Skin Problems) आणि कुपोषणाचाही त्रास होऊ शकतो. अन्न चावून खाण्याचे फायदे अन्न नीट चावून खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्यं मिळतात आणि पचनसंस्था निरोगी राहते. त्यामुळे गॅस (Gas), पोटात जळजळ, पोट फुगणं अशा समस्याही दूर होतात. जर आपण अन्न नीट चावून खाल्लं तर आपण लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाच्या (Weight Gaining) समस्येपासून दूर राहू शकतो. International Yoga Day 2022:  ही 4 योगासनं करा, डोळ्यांच्या समस्या होतील दूर घास 32 वेळा का चावला पाहिजे? अन्न गिळण्यापूर्वी 32 वेळा चावणं आवश्यक आहे. कारण या प्रक्रियेत अन्नाचे बारीक कण होतात आणि त्यात लाळ मिसळते. त्यामुळे पचनक्रियेवर ताण पडत नाही. आंबा (Mango), टरबूज (Watermelon), संत्री (Orrange) अशी काही मऊ फळं आपल्याला 32 वेळा चावण्याची गरज भासत नाही. तर, बदाम, काजू असे काही कडक पदार्थ 40 वेळा चावून खावे लागतात. आपली पचनक्रिया सुरळीत राहावी म्हणून अन्न चावून खाणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या