JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / बदलत्या वातावरणापासून मुलांना वाचवा; सर्दी-खोकल्यावर करू शकता हे घरगुती उपाय

बदलत्या वातावरणापासून मुलांना वाचवा; सर्दी-खोकल्यावर करू शकता हे घरगुती उपाय

हवामान बदललं की, मुलांच्या आरोग्यावर परिणाम दिसायला लागतो. मात्र, लगेच डॉक्टरांच्याकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.

जाहिरात

सर्दी-खोकल्यावरील घरगुती उपाय

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 डिसेंबर: बदलत्या हवामानात मुलांना खोकला आणि सर्दी होणं तशी सामान्य गोष्ट आहे. हवामान बदललं की, मुलांच्या आरोग्यावर परिणाम दिसायला लागतो. मात्र, लगेच डॉक्टरांच्याकडे जाण्यापूर्वी काही घरगुती उपाय करता येऊ शकतात. त्याविषयी आपण जाणून घेऊया. लहान मुलांना वातावरण बदललं की लगेचच खोकला आणि सर्दीचा (Cough and cold) त्रास व्हायला लागतो. लहान मुलांना मोठ्यांपेक्षा सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो. कित्येक पालकांचीही मुलांना खोकला-सर्दीसाठी डॉक्टरकडे नेण्याची इच्छा नसते, त्यामुळेच घरात असलेल्या गोळ्या किंवा औषधे मुलांना दिली जातात. पण,अशी औषधं देण्यापेक्षा मुलांवर घरगुती उपचार करणं नेहमी चांगलं असतं. जाणून घेऊ यात काही घरगुती उपाय. ओव्याचं पाणी सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी लहान मुलाला दोन ते चार वेळा ओव्याचं पाणी पाजा. हे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. लहान मुलांना हे पाणी थोड्याथोड्यावेळाने 2 ते 4 चमचे पाजत रहा. मोठ्यांसाठी हे प्रमाण अर्धा कप करू शकता. याने सर्दी-खोकल्यात आराम मिळेल. हळद दूध सर्दी-खोकला बरा होण्यासाठी दुधात हळद मिसळून प्यावी. यासाठी दूधात हळत घालून गरम करा आणि कोमट असताना बाळाला प्यायला द्या. यासाठी कच्ची हळद वापरल्यास तिचा आणखी फायदा होतो. कच्ची हळद उपलब्ध नसेल तर, हळद पावडरही वापरता येऊ शकते.

काढा प्या - मुलाला दिवसातून कमीतकमी दोनदा काढा देणं आवश्यक आहे. मूल लहान असेल तर एक ते दोन चमचे काढा द्या. मूल मोठं असेल तर, अर्धा कप काढा देऊ शकता. बाजारातही चांगल्या प्रतीचे काढे उपलब्ध आहेत. बाजारामधून आणणं शक्य नसेल तर घरीच तुळस,दालचिनी,लवंग,मिरपूड आणि आल्याचा काढा देखील बनवू शकता. हे वाचा -  व्हॅक्सिनसह या 4 गोष्टींचे करा पालन, कोव्हीडच्या व्हेरिएंटपासून राहाल सुरक्षित (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या