लग्नाचा विचार कधी करावा
नवी दिल्ली, 23 डिसेंबर : मित्र-मैत्रिणी कितीही असले तरी ‘ते नातं’ जरा वेगळं असतं. एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये प्रेमाची अशी घट्ट वीण तयार होते की, वाटायला लागतं आता कोणीही आपल्याला वेगळं करू शकत नाही. पण हेच Relationship Status लक्षात यायला थोडा वेळ घ्यावा लागतो. प्रेमात पडलेल्यांना समोरची व्यक्ती आपल्या प्रेमात आहे का? असली तर प्रेम किती आहे? हे रिलेशन खरंच सीरियस असणार आहे का? असे अनेक प्रश्न पडतात. वेळीच या प्रश्नांची उत्तर मिळाली नाहीत तर, ते नातं गमवावंही लागतं किंवा एखाद्या रिलेशनमध्ये प्रेमाची कबुली दिल्यानंतरही काही शंका मनात राहून जातात. याच शंका मनामधून काढण्यासाठी काय करायचं ? याचं उत्तर जाणून घेऊयात. तुम्हाला तुमचं Relationship Status जाणून घ्यायचं असेल तर, त्यासाठी काही निरिक्षणं नोंदवायला लागतील. त्यासाठी काही टप्पे ठरवायला लागतील. विश्वास ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत आहात. त्याच्यावर किती विश्वास ठेवत आहात. त्याने किंवा तिने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवताना मनात शंका तर येत नाही ना? त्याच्या डोळ्यात-डोळे घालून बोलताना आपण फसवलं जात आहोत. अशी भावना तर वाटत नाही ना? याचा विचार करा. आपल्या पार्टनरने सांगितलेल्या गोष्टीबद्दल इतरांनी मत व्यक्त केल्यावर काय विचार मनात येतात? हे पहा. जर कोणत्याही शंकेशिवाय जोडीदारावर विश्वास ठेऊ शकत असाल तर, समजा तुमचं नातं पक्क झालं आहे. शांतताही बोलते रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात तो किंवा ती बरोबर असताना शांतपणाही हवाहवासा वाट राहतो. पण, एक टप्पा ओलांडल्यानंतरही तिच भावना मनात येते का? सुरुवातीला जोडीदाराबरोबर बोलता यावं. यासाठी बोलण्यासारखे विषय नसतानाही फालतू गप्पा मारण्यासाठी कोणत्याही विषयावर बोलणं सुरू करतो. पण, काळाबरोबर जोडीदाराचं शांत राहणंही तुम्हाला समजायला लागलं असेल, त्याने किंवा तिने न बोलताही भावना कळत असतील तर, समजा तुमचं नातं घट्ट झालं आहे. त्याचा प्रत्येक मूड तुम्हाला आता कळतो आहे.
काहीही बोलू शकता नातं आता अशा वळणावर आहे की, एकमेकांशी कोणत्याही विषयावर बोलू शकता. न लपवता मनातलं सांगू शकता. तुमच्यातल्या कमतरता, असुरक्षिततेची भावना व्यक्त करताना अवघडलेपणा जाणवत नाही. उलट न पटलेल्या गोष्टीवरही ठामपणे, बेधडक मतं मांडू शकता. त्याच्या असण्यानेच कम्फर्टेबल वाटायला लागतं, अशी कंडीशन निर्माण झाली असेल तर, तुमचं नात घट्ट झालं आहे असं समजावं. हे वाचा - कोरोनाविरोधात भारताकडे आणखी एक शस्त्र, भारत बायोटेकची नेजल व्हॅक्सिन सज्ज बिनधास्तपणे वावर सुरुवातीला भेटताना एकमेकांसाठी तयार होणं, छान कपडे घालणं सुरू असतं. पण, जेव्हा नात्यात सहजता येते तेव्हा, त्याच्यासमोर किंवा तिच्यासमोर कोणत्याही कपड्यांमध्ये, कोणत्याही परिस्थितीत राहायला कंफर्टेबल वाटत असेल तर, तुमच्या दोघांमध्ये नात्यातला बिनधास्तपणा आलेला आहे**.** हे वाचा - या पाच सवयी विसरला असाल, तर पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू कोणत्याही कारणाशिवाय संवाद आता कोणत्याही कारणाशिवाय एकमेकांना मेसेज करत असाल. फक्त संवाद करण्यासाठी, काळजीने मेसेज करत असाल. तर, तुमचं नातं अशा पॉइंटवर पोहचलं आहे. जिथे तुम्ही एकमेकांमध्ये मिसळून गेले आहात, असा त्याचा अर्थ निघतो. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)