JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका

Food To Increase Platelet Count : हे पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच वाढतील प्लेटलेट्स; डेंग्यूपासून लगेच होईल सुटका

अशी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत जी प्लेटलेट्स वेगाने वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डेंग्यू झाल्यास कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करावा ते आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑक्टोबर : डेंग्यू एकदा वाढीस लागला की, त्याचा प्रसार झपाट्याने वाढतो. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना डेंग्यू झाला आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला डेंग्यू झाला आहे, त्यांच्या प्लेटलेटच्या संख्येवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या प्लेटलेटची संख्या कमी होत असेल तर ती धोक्याची बाब ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. या पदार्थांच्या मदतीने आपले आरोग्य सुधारते आणि प्लेटलेट काउंटमध्ये झपाट्याने वाढ होते. मेडिकल न्यूज टुडेच्या मते, अशी अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जी प्लेटलेट्स वाढविण्यात मदत करू शकतात. त्यामुळे डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट्स झपाट्याने वाढवण्यासाठी तुम्ही या पदार्थांचा समावेश करू शकता.

Diabetes ला रोखण्याचा सोपा मार्ग; लक्षणं दिसताच त्वरित करा हे 5 उपाय

प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी खा हे पदार्थ फोलेट समृद्ध अन्न : फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी निरोगी रक्त पेशी वाढवते. अशा परिस्थितीत तुम्ही आहारात अधिकाधिक हिरव्या पालेभाज्या, बीन्स, भात इत्यादींचा समावेश करावा.

व्हिटॅमिन बी 12 समृद्ध अन्न : व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या कमतरतेमुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. यासाठी तुम्ही बीफ लिव्हर, अंडी, सॅल्मन, बदामाचे दूध, सोया मिल्क इत्यादींचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न : व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच प्लेटलेट्स वाढण्यास मदत करते. यासाठी ब्रोकोली, स्प्राउट्स, लाल हिरवी शिमला मिरची, संत्री इत्यादींचे सेवन करा. व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न : संशोधनात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन डी अस्थिमज्जा पेशींच्या निर्मितीस मदत करते जे प्लेटलेट्स आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. यासाठी अंडी, तेल मासे, डाळी, मशरूम इत्यादींचे रोज सेवन करावे.

या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना?

संबंधित बातम्या

व्हिटॅमिन के समृद्ध अन्न : रक्त गोठणे आणि हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन के एक आवश्यक घटक आहे. हे प्लेटलेटची संख्या सुधारण्यास मदत करते. यासाठी आहारात सूर्यफूल, ब्रोकोली, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सोयाबीन, भोपळा इत्यादींचे सेवन करावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या