प्रतिकात्मक फोटो
मुंबई 25 ऑक्टोबर : आपण बाहेर पडलो की आपल्याला बऱ्याच ठिकाणी डास असल्याचे पाहायला मिळतात. अगदी घाणेरड्या जागेपासून ते जास्त झाड असलेल्या ठिकाणी देखीत ते फिरत असतात. हे डास आपल्याला चावले की आपल्याल वेदना तर होतातच, शिवाय यामुळे मलेरिया सारखे आजार होतात. हा आजार इतका धोकादायक नसला तरी यामुळे काही लोकांचे प्राण गेल्याचे देखील समोर आले आहे. पण तुम्ही डासांच्या बाबतीत एक गोष्ट पाहिली आहे का? काही लोकांच्या आजूबाजूला खूप डास फिरत असतात, तर काही लोकांच्या बाजूला फार कमी डास असतात. असं का घडतं? यासाठी, अनेक संशोधन देखील केले गेले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले की त्वचेचा वास हे डासांना माणसांकडे आकर्षित करतात. ज्यामुळे ते कमी जास्त प्रमाणात लोकांकडे आकर्षित होतात. जर्नल सेलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधनासाठी 64 लोकांचा समावेश करण्यात आला, ज्यांनी त्यांच्या हातावर नायलॉन स्टॉकिंग्ज घातले होते. जे सहा तासानंतर काढण्यात आले. आता या स्टॅकिन्सवरती त्यात्या लोकांच्या अंगाचा विशिष्ट वास होता. हे ही वाचा : कधी पाहिलय रस्त्यावर रंगीत दगड? ते का लावले जातात आणि त्याचं काम काय? संशोधकांनी या नायलॉनचे तुकडे केले आणि ते दोन वेगळ्या कंटेनरमध्ये ठेवले ज्यात मादी एडिस इजिप्ती डास आहेत (ज्यामुळे झिका विषाणू, डेंग्यू, पिवळा ताप आणि चिकनगुनिया पसरतो). सहभागींना एक क्रमांक देण्यात आला आणि आढळले की 33 नंबर वाल्या व्यक्तीला सर्वाधिक डास चावतात. ते इतरांपेक्षा चारपट जास्त होते. ज्यामुळे या प्रयोगामुळे असे सिद्ध झाले की डास त्वचेच्या सुगंधाकडे जास्त आकर्षित होतात आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हा त्वचेचा वास काय आहे? यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या मते, डासांमध्ये अन्न शोधण्यासाठी एक विशेष रिसेप्टर असतो, ज्यामुळे ते आपण जो श्वास घेतो, तसेच आपल्या त्वचेचा वास घेण्यासाठी मदत करतो. तो कार्बन डायऑक्साइड शोधण्यात मदत करतो. तुमच्या त्वचेवरील बॅक्टेरियाच्या विघटनामुळे हा वास येतो. हे ही वाचा : न मारताच घरातील उंदीर पळवण्याचे भन्नाट उपाय, जाणून घ्या Home Remedies वेगवेगळ्या लोकांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात, ज्यांना एक विशिष्ट वास असतो, ज्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या अंगाला एक वेगळाच दुर्गंध असतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, डास त्यांच्या वासाच्या आधारे लोकांमध्ये फरक करू शकतात. रक्त गटाची देखील मोठी भूमिका त्वचेच्या वासासह, संशोधकांनी असेही नोंदवले आहे की विशिष्ट रक्त प्रकार असलेल्या लोकांकडे डास अधिक आकर्षित होतात. संशोधनात असे आढळून आले आहे की ज्यांचा रक्तगट O प्रकारचा आहे, त्यांच्याकडे डासांच्या अनेक प्रजाती आकर्षित होतात. यामध्ये फरक इतका मोठा आहे की A ब्लड ग्रुपवाल्यांच्या दुप्पट डास O ब्लड ग्रुपवाल्या लोकांचं रक्त पसंत करतात.