JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / पालकांनो मुलांना दूध-बिस्कीट देत असाल तर सावधान! Milk Biscuit Syndrome चा धोका

पालकांनो मुलांना दूध-बिस्कीट देत असाल तर सावधान! Milk Biscuit Syndrome चा धोका

आपण सर्रास आपल्या मुलांना दूध-बिस्कीट खायला देतो कारण ते मुलांना आवडतं आणि आपल्यालाही ते मुलांसाठी पोषक असल्याचं वाटतं. मात्र हे कॉम्बिनेशन मुलांसाठी अजिबात चांगले नसते.

जाहिरात

फोटो सौजन्य - Canva

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुलं जशी मोठी होत जातात. तसे आपण त्यांना वेगवेगळे पदार्थ द्यायला सुरुवात करतो. मुलांचं पोषण होईल या दृष्टिकोनातून आपण मुलांना बरेच पदार्थ खाऊ घालतो. यामध्ये दूध आणि बिस्कीट हे अग्रस्थानी असतात. आपण सर्रास आपल्या मुलांना दूध बिस्कीट खायला देतो कारण ते मुलांना आवडतं आणि आपल्यालाही ते मुलांसाठी पोषक असल्याचं वाटतं. मात्र हे कॉम्बिनेशन मुलांसाठी अजिबात चांगले नसते. होय, आज आम्ही तुम्हाला यामुल्वे होणाऱ्या मिल्क बिस्कीट सिंड्रोम याविषयी माहिती देणार आहोत. मिल्क बिस्कीट सिंड्रोम हे मुलांमध्ये दिसणारे खूप सामान्य डिसऑर्डर आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, हा कोणताही आजार किंवा रोग नाहीत एक डाएट डिसऑर्डर आहे. मात्र हे सामान्य असले तरी याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते. आहाराच्या या पद्धतीमुळे मुलांना खोकला, नाक वाहणे, घसा खवखवणे, थकवा आणि बद्धकोष्ठता असे अनेक त्रास होऊ शकतात. याविषयी आयुर्वेदिक डॉक्टर नागरेकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.

Benefits of Dry-fruits : उत्तम आरोग्यासाठी अक्रोड खाणं कधीही चांगलं; फायदे वाचून तुम्हीही रोज खायला सुरूवात कराल

काय आहे मिल्क बिस्कीट सिंड्रोम? मिल्क बिस्कीट सिंड्रोम हा एक डाएट डिसऑर्डर आहे. म्हणजे आहार चुकीच्या पद्धतीने घेतल्यास हे डिसऑर्डर होते. हे डिसऑर्डर जास्त प्रमाणात 1 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये होते. जेव्हा एखादी मोठी व्यक्ती आहार घेते. त्यानंतर त्या आहारातील पोषक तत्व शरीराला लाभतात आणि जो उरलेले भाग असतो तो शरीरातून बाहेर पडतो. मात्र लहान मुलांमध्ये असे नसते. त्यांची पचनक्रिया हळूहळू वाढत असते. मात्र जेव्हा 6 महिन्यानंतर लगेच पालक आपल्या बाळाला वेगवेगळे पदार्थ देतात आणि तेही जास्त प्रमाणात देतात. तेव्हा बाळाला त्रास होण्याची शक्यता असते.

मिल्क बिस्कीट सिंड्रोममध्ये मुलांना होतात हे त्रास मुलांना दुधाचे पदार्थ आणि दुधासोबत वेगवेगळे पदार्थ जास्त प्रमाणात खायला दिल्याने हे डिसऑर्डर होते. मुलांच्या वाढीमध्ये हे डिसऑर्डर अडथळा बनू शकते. यादरम्यान मुलांचे वजन कमी होत नाही किंवा वाढतही नाही. म्हणजेच मुलांची वाढ थांबते. बऱ्याचदा आपण मुलांना त्यांचं पोषण होईल म्हणून किंवा आपल्याला जास्त वेळ नाही म्हणून किंवा मुलांना आवडतं म्हणून दूध आणि बिस्कीट खायला देतो.

Kale Day : पालकासारखी दिसणारी ही केल भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर?

संबंधित बातम्या

एखादा दिवस खाल्यास हरकत नाही परंतु हे मुलांना वारंवार दिल्याने त्यांना त्याची सवय लागते आणि ही सवय हळूहळू व्यसन बनते. यानंतर जर कधी मुलांना दूध आणि बिस्किटाचे मिश्रण मिळाले नाही तर ते चीड चीड करू लागत. अशी चिडचिड होणे या डिसॉर्डरचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन हे सुद्धा एक महत्वाचे लक्षण आहे. बिस्कीट हे एक बेकरी प्रॉडक्ट आहे. त्यामुळे ते खूप रुक्ष असते आणि जेव्हा हे बिस्कीट दुधासोबत मिसळले जाते तेव्हा त्या दोन्हीचं एक जड मिश्रण तयार होतं. हे जड मिश्रण मुलांमध्ये बध्ध्दकोष्टता होण्यास कारणीभूत ठरते. यामुळे मुलांना विष्ठा करताना त्रास होतो आणि ती जागा कडक आणि लाल होते. यामुळे मुलांना खूप वेदना होतात.

हे पदार्थ देखील मुलांसाठी ठरू शकतात घातक मिल्क बिस्कीट सिंड्रोम म्हणजे केवळ दूध आणि बिस्किटांमुळेच मुलांना त्रास होतो असे नाही. ज्या ज्या पदार्थांमुळे मुलांना कॉन्स्टिपेशन होते ते सर्व पदार्थ या डिसॉर्डरला कारणीभूत ठरतात. मुलांना मैद्याचे पदार्थ देणे टाळावे. त्याचबरोबर मुलांना जंक फूड म्हणजेच न्युडल्स, पास्ता असे पदार्थदेखील मुलांसाठी त्रासदायक ठरू शकतात. हवाबंद डब्यातील पदार्थही मुलांना देऊ नये.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या