JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Ayurveda Vs Homeopathy : आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये नेमका फरक काय?

Ayurveda Vs Homeopathy : आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये नेमका फरक काय?

तब्येत बिघडल्याबरोबर रुग्णालयात जातात. काही लोक असेही आहेत जे रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेतात आणि आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करता. तर काही लोक होमिओपॅथीला प्राधान्य देतात.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 ऑक्टोबर : कोरोनानंतर आता लोक आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेतायत. तब्येत बिघडल्याबरोबर रुग्णालयात जातात. काही लोक असेही आहेत जे रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेतात आणि आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करता. तर काही लोक होमिओपॅथीला प्राधान्य देतात. आरोग्याच्या काही समस्या असल्यास आपल्याकडे आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी असे पर्याय असतात. Gadget-Info.com मध्ये सांगितले गेले आहे की, आयुर्वेद औषधाचा पर्यायी प्रकार आहे, जिथे भाज्या, वनस्पती, औषधी वनस्पती आणि खनिजे यांच्यापासून बनवलेली औषधे वापरली जातात. होमिओपॅथी देखील एक पर्यायी औषध मानले जाते, जी आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी चालना देते. तिसरे आहे अॅलोपॅथी, जिथे उपचार पारंपारिक माध्यमांद्वारे दिले जातात, म्हणजे औषधांनी बनलेले आहे ज्याचा लक्षणांचा विपरीत परिणाम होतो.

Side Effects of Cucumber : यावेळी चुकूनही खाऊ नका काकडी, फायद्याऐवजी होईल नुकसान

आयुर्वेद म्हणजे काय? आयुर्वेदातून मिळालेल्या विविध प्रकारच्या जागतिकीकृत आणि आधुनिकीकृत उपचार पद्धतींना पर्यायी औषध म्हणून ओळखले जाते. उपचाराचा हा प्रकार भारतात वैदिक काळात विकसित झाला, जिथे औषधी वनस्पती, भाज्या आणि खनिजे रोग बरे करण्यासाठी वापरली जातात. आयुर्वेदाचा मुख्य भर रोगापासून बचाव आणि संपूर्ण मानवी शरीराच्या आरोग्यदायी सुधारावर आहे. हे एक निर्विवाद सत्य आहे की ही प्रक्रिया वेळ घेणारी आहे आणि बरेचदा परिणाम उशीरा होतो. परंतु आयुर्वेदाचा एक फायदा की त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

होमिओपॅथी म्हणजे काय? Career 360 नुसार, होमिओपॅथी ही एक पर्यायी औषध प्रणाली आहे, जी जर्मन वैद्य सॅम्युअल हॅनेमन यांनी विकसित केली होती. या प्रकारच्या औषधोपचारात, आजारी व्यक्तीच्या शरीराला अशाच प्रकारच्या इतर रोगांचा सामना करावा लागतो, यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि रोगाशी लढण्यास मदत होते. होमिओपॅथिक उपचार ही एक मंद प्रक्रिया आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

Heart Attack नाही, तर ‘या’ 4 कारणांमुळे देखील दुखू शकते छातीत

संबंधित बातम्या

तुलनेसाठी आधारआयुर्वेदहोमिओपॅथी
अर्थआयुर्वेद हे औषधांचा पर्यायी प्रकार आहे, ज्यामध्ये औषधी वनस्पती, भाज्या आणि खनिजे रोग बरा करण्यासाठी आणि कायमचे नष्ट करण्यासाठी वापरली जातात.होमिओपॅथी औषधांमुळे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते आणि आजाराविरूद्ध लढण्यास शरीर प्रवृत्त होते. त्यामुळे रुग्ण बरा होतो.
इतिहासभारतातील वैदिक काळात म्हणजेच 3,500 वर्षांपूर्वी विकसित झाले.18 व्या शतकात जर्मनीमध्ये सॅम्युअल ख्रिश्चन हॅनेमन यांनी विकसित केले.
निदानआयुर्वेद नाडी निदानावर आधारित आहेआजाराची लक्षणं आणि चिन्हे यावर आधारित.
आयडियॉलॉजिआयुर्वेदात वात, पित्त आणि कफ या तीन घटकांद्वारे शरीरातील त्रास आणि रोग ओळखले जातात.होमिओपॅथीमध्ये शरीराला चालना देणारी औषधे दिली जातात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि विशिष्ट रोगाशी लढते.
वापरली जाणारी औषधंआयुर्वेदिक औषधांमध्ये औषधी वनस्पती, भाजीपाला आणि खनिजे वापरली जातात.होमिओपॅथीमध्ये औषधे अल्कोहोल किंवा डिस्टिल्ड वॉटरमध्ये पातळ करून तयार केली जातात. औषधे बनवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ वनस्पती आणि प्राणी यांचे संश्लेषण असू शकतात.
अधिक प्रक्रियांचा वापरआयुर्वेदात पंचकर्म चिकित्सा, क्षर सूत्र आणि योगावरही भर दिला जातो.होमिओपॅथी उपचारात वेगळी कोणतीही प्रक्रिया नाही.
दुष्परिणामतांबे, सोने, चांदी, गंधक इत्यादी खनिजांच्या वापरामुळे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते किंवा नसतेच.दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या