JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / धक्कादायक! Online gaming चं असं व्यसन; 15 वर्षांच्या मुलीने पँटमध्ये लघवी केली पण खेळणं सोडलं नाही

धक्कादायक! Online gaming चं असं व्यसन; 15 वर्षांच्या मुलीने पँटमध्ये लघवी केली पण खेळणं सोडलं नाही

ऑनलाइन गेमिंगचे लहान मुलांवरील भयावह दुष्परिणाम समोर आले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 मार्च : हल्ली लहान मुलांच्या हातातही मोबाईल आले आहेत. त्यामुळे मुलांना मोबाईलचं व्यसन जडलं आहे. कोरोना लॉकडाऊनमध्ये तर ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा मोबाईलचा वापर अधिकच वाढला आहे. हळूहळू ऑनलाइन गेमिंगचं (Online gaming) व्यसन लागलं आणि हे व्यसन इतकं जडलं की ज्याचे इतके भयावर परिणाम समोर येऊ लागले आहेत, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल (Online gaming addiction) . एका 15 वर्षीय मुलीचं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात ती ऑनलाइन गेमिंगचं इतकी गुंतली की लघवीही तिने पँटमध्येच केली पण गेम खेळणं सोडलं नाही (Child urinated in pants but not stop online gaming). शरीराच्या नैसर्गिक कार्यांचीही त्याने पर्वा केली नाही. तिच्या ऑनलाईन गेमचं व्यसन सोडवण्यासाठी तिचे पालक तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले. लोकमत हिंदी च्या वृत्तानुसार मुंबईतील डॉक्टर सागर मुंदडा यांनी सांगितलं की, मुलगी खेळात इतकी गुंग व्हायची की बऱ्याच वेळा तिने आपल्या पँटमध्येच लघवी केली पण गेम थांबवायला तयार नाही. गेमिंगच्या नादात तिनं अभ्यासही बंद केला आहे. शाळेत जाणं सोडलं आबे. तिचे आईवडीलही तिच्या या व्यसनाला लगाम लावू शकले नाही. हे वाचा -  विचित्र आजार! खाद्यपदार्थ दिसताच कोसळतं रडू; खातानाच ढसाढसा रडते ही व्यक्ती मुलांना इतकं व्यसन लागलं आहे की रात्री मुलं झोपतही नाहीत. त्यांना गेम खेळण्यापासून रोखलं की ते हिंसक होतात. मारहाण सुरू करतात. काही मुलांनी मान्य केलं की ते गेममध्ये इतके गुंतून राहयचे की खेळताना ते खाणंही विसरून जाचयेच किंवा गेम खेळताना खाण्याआधी किंवा खाल्ल्यानंतर हात धुण्यासाठीही उठायचे नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाबाबत संशोधन कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही महिन्यांत एम्समधील एका प्राध्यापकाकाने ऑनलाइन सर्व्हे केला जो इंडिय़न जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आला. कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यात आला. 128 विद्यार्थ्यांपैकी 50.8 टक्के विद्यार्थ्यांनी  सांगितलं की लॉकडाऊनदरम्यान त्यांच्या गेमिंगमध्ये वाढ झाली आहे. या कालावधीत गेमिंग त्यांना तणावाचा सामना करण्यात मदत करतं. हे वाचा -  Shocking! पोटात सुरू झाल्या तीव्र वेदना आणि ‘प्रेग्नंट’ झाला 46 वर्षांचा पुरुष डिसेंबर 2021 मध्ये एल्सेविअर्स सायन्स डायरेक्ट रिसर्च पेपरमध्ये नमूद केल्यानुसार 289 मुलांचा अभ्यास करण्यात आला. 6-17 वयोगटातील 80.47 टक्के मुलांमध्ये कोरोना लॉकडाऊनमध्ये गेमिंगगचं व्यसनाचा धोका जास्त होता. यूएईच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांच्या व्यहारात सामाजिक आणि मानसिक धोका वाढण्याची शक्यता दिसून आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या