मुंबई, 16 डिसेंबर : प्राचीन काळापासून गंगा (Ganga River) ही पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. हिला देशाची धमनी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार गंगा ही सर्वात महत्त्वाची नदी आहे. पवित्र गंगा नदी तिच्या शुद्धतेमुळे हजारो वर्षांपासून लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात गंगेला आता राजकीय महत्वही प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 13 डिसेंबर रोजी गंगास्नान करत काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं (kashi vishwanath dham) उद्घाटन केलं, यावरुन नदीचं महत्व अधोरेखित होतं. याच नदी संदर्भातील काही रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग वाट कसली बघताय? गंगेचा उगम कोठे होतो? गंगा नदी हिमालय पर्वतापासून उत्तर भारत आणि बांग्लादेशातून बंगालच्या उपसागराला मिळण्यासाठी 2 हजार 525 किलोमीटर प्रवास करते. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री ग्लेशियरपासून सुरू होते. हिमनदी 3,892 मीटर (12,769 फूट) उंचीवर स्थित आहे. गंगा नदी भारत आणि बांग्लादेश या देशांतून वाहते. यादरम्यान बंगाल प्रदेशातील तिचा मोठा भाग आहे, जो ब्रह्मपुत्रा नदीसोबत मिसळतो, हा भाग जास्तकरुन बांग्लादेशात आहे. गंगा ही भारतीय उपखंडातील प्रमुख नद्यांपैकी एक आहे जी उत्तर भारतातील गंगेच्या मैदानातून बांगलादेशात पूर्वेकडे वाहते. ही नदी भारताच्या उत्तराखंड राज्यातील पश्चिम हिमालयात सुमारे 2,510 किमी अंतर व्यापते आणि बंगालच्या उपसागरातील सुंदरबन डेल्टाला मिळते. गंगेची खोली? या नदीची सरासरी खोली 16 मीटर (52 फूट) आणि कमाल खोली 30 मीटर (100 फूट) आहे. गंगेत वाहणाऱ्या प्रमुख नद्यांमध्ये रामगंगा, गोमती, घाघरा, गंडकी, बुधी गंडक, कोशी, महानंदा, तमसा, यमुना, सोन आणि पुनपुन यांचा समावेश आहे. सुपीक माती असलेलं गंगेचं खोरं भारत आणि बांग्लादेशच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. पाटलीपुत्र, अलाहाबाद, कन्नौज, मुर्शिदाबाद, कलकत्ता इत्यादी अनेक पूर्वेच्या प्रांतीय किंवा राजेशाही राजधान्या तिच्या काठावर वसलेल्या असल्याने हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. गंगेचे खोरे सुमारे 1,000,000 चौरस किलोमीटर पसरले आहे.
सर्वात मोठा भाग सिंचनाखाली गंगा आणि तिच्या उपनद्या मोठ्या क्षेत्रात बारमाही पाणी पुरवतात. या भागात अनेक पिके घेतली जातात. गंगेच्या खोऱ्याने 1 दशलक्ष चौरस किलोमीटर (386,000 चौरस मैल) पेक्षा जास्त भाग व्यापलेला आहे. जगातील कोणत्याही नदीच्या खोऱ्यात गंगेइतकी लोकसंख्या राहत नसेल. त्यात 400 दशलक्षाहून अधिक लोकांचा समावेश आहे. गंगेचे खोरे अनेक वैविध्यपूर्ण परिसंस्थांना आधार देते, गौमुखजवळील अल्पाइन जंगलांपासून ते उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशातील खारफुटीच्या जंगलांपर्यंत आणि पश्चिम बंगालच्या खारट मातीच्या वृक्षापर्यंत सर्वांना संजीवनी देण्याचं काम गंगा करते. पश्चिम हिमालयात उगम गंगा ही आशियातील एक नदी आहे जी पश्चिम हिमालयात उगम पावते आणि भारत आणि बांग्लादेशमधून वाहते. पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केल्यावर पद्मा आणि हुगळीत तिचे विभाजन होते. पद्मा नदी बांग्लादेशातून वाहते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात येते. हुगळी नदी पश्चिम बंगालच्या विविध जिल्ह्यांतून जाते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात येते. त्यामुळेच गंगा ही भारतीय परंपरा, जीवन आणि संस्कृतीचा मध्यवर्ती भाग मानली जाते. ही भारतातील चार सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आहे. या चार नद्या म्हणजे सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा आणि गोदावरी. पाण्याच्या विसर्जनाच्या आधारे गंगा नदी ही जगातील तिसरी सर्वात मोठी नदी आहे आणि ती सर्वात पवित्र मानली जाते.
धार्मिक महत्व हिंदू धर्मात, कोणत्याही पूजा किंवा अन्यथा शुभ कार्यापूर्वी शुद्ध मनाने आणि शुद्ध पाण्याने संकल्प घेण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पूजेच्या संकल्पासाठी शुद्ध आणि पवित्र गंगेचे पाणी सर्वात योग्य मानले जाते. तसेच गंगाजलाचा उपयोग देवतांच्या शुद्धीकरणासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी केला जातो. गंगा शिवाच्या जटांद्वारे पृथ्वीवर पोहोचत असल्याने, भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजल अत्यंत आवश्यक मानले जाते. श्रावण महिन्यात भगवान शंकराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचे खूप महत्त्व आहे. महादेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी शिवसाधक कावड घेऊन पवित्र गंगाजल भरतात आणि आपापल्या शिवधामात जाऊन शंकराला गंगाजलाचा अभिषेक करतात.