JOIN US
मराठी बातम्या / Explainer / पर्यावरण ऱ्हासाचे भयंकर परिणाम! महाराष्ट्रात सूर्याची ऊर्जाही होतेय कमी, काय आहे कारण?

पर्यावरण ऱ्हासाचे भयंकर परिणाम! महाराष्ट्रात सूर्याची ऊर्जाही होतेय कमी, काय आहे कारण?

वातावरण बदलामुळे महाराष्ट्राच्या अक्षय ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असा धक्कादायक निष्कर्ष आपल्या देशाच्या मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आला आहे.

जाहिरात

सौरऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र मागे पडण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 ऑगस्ट: वातावरण बदलाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत घटकांवर होत असतो, तसाच तो महाराष्ट्राच्या सौर आणि पवन ऊर्जेच्या संभाव्य क्षमता विकसनावरदेखील पुढील पाच दशके होणार आहे. सोप्या शब्दांत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा येत्या काही काळात पर्यावरण ऱ्हासामुळे कमी होणार असून याचा फटका महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसणार आहे, असा धक्कादायक निष्कर्ष देशातल्या आघाडीच्या संशोधकांनी काढला आहे. अॅनालिसिस ऑफ फ्यूचर विंड अॅण्ड सोलर पोटेन्शियल ओव्हर इंडिया युजिंग क्लायमेट मॉडेल्स(Analysis of future wind and solar potential over India using climate models) या शीर्षकाचा ताजा अभ्यास नुकताच करंट सायन्स या पिअर-रिव्ह्यूड जर्नलमध्ये प्रकाशित झाला. भू-विज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Earth Scinces) अंतर्गत असलेल्या पुण्यातल्या IITM चे टीएस आनंद, दीपा गोपालकृष्णन आणि पार्थसारथी मुखोपाध्याय तसंच, न्यूयॉर्क विद्यापीठ अबुधाबी येथील सेंटर फॉर प्रोटोटाईप क्लायमेट मॉडेलिंग येथील संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. भारतीय उपखंडातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातले (Sustainable Energy) पवन आणि सौर ऊर्जेच्या अंदाजाचे नजीकच्या भविष्यासाठी (पुढील 40 वर्षे) विश्लेषण करण्यासाठी, संशोधकांनी इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजद्वारा (आयपीसीसी) तयार केलेल्या अत्याधुनिक क्लायमेट मॉडेल्सचा वापर करून हा अभ्यास केला आहे. या अभ्यासातल्या महाराष्ट्राबद्दलच्या निरीक्षण आणि निष्कर्षांबद्दल पुण्यातल्या IITM चे शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखोपाध्याय (Parthsarathi Mukhopadhyay) म्हणाले, “महाराष्ट्र, गुजरातसारख्या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये वातावरण बदलाचा नैसर्गिक उर्जानिर्मितीमध्ये होणारा परिणाम अभ्यासलाय त्यावेळी ही अपारंपरिक उर्जा भविष्यात कमी होणार असल्याचं दिसतं.” पुढच्या 50 वर्षांत 10 ते 15 टक्क्यांपर्यंत घट सौरउर्जा निर्मितीत होऊ शकते, असं मुखोपाध्याय म्हणाले. Goodfellows: रतन टाटांनी पुणेकर तरुण दोस्ताच्या नव्या Startup मध्ये केली गुंतवणूक, ज्येष्ठांना ‘कंपनी’ देणारी कंपनी सूर्याची ऊर्जा कमी होण्याच्या कारणांमधलं प्रमुख कारण सततचं ढगांचं आच्छादन असू शकेल. मान्सूनच नव्हे तर पावासाळ्याखेरीजचा कालावधीसुद्धा मोकळं आकाश असणारे दिवस कमी होतील. वातावरण बदलांचा हा परिणाम आहे. याउलट पवनउर्जा वाढवण्याची शक्यता या क्लायमेट मॉडेलच्या अभ्यासात दिसली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांत पावसाळ्याचे चार महिने आणि इतरही कालावधी वाऱ्याचा वेग वाढून पवनउर्जेसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकतं, असंही ते म्हणाले. अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी स्थापित यंत्रणेच्या क्षमतेमध्ये (10.78 गिगावॉट) महाराष्ट्र देशातील अव्वल राज्यांमध्ये आहे. ज्यामध्ये पवन ऊर्जा 5.01 गिगावॉट आणि सौर ऊर्जा 2.75 गिगावॉटचा वाटा आहे. तसेच विकेंद्रीत यंत्रणेतील अक्षय ऊर्जा निर्मितीमध्येदेखील दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील एकूण ऊर्जा निर्मितीमध्ये 30जून 2022 पर्यंत 24.66 टक्के वाटा अक्षय ऊर्जा क्षेत्राचा आहे. “महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य भारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर लगतच्या राज्यांमधील सौर ऊर्जेच्या संभाव्य क्षमतेचा अंदाज हा नजीकच्या भविष्यासाठी ठोस नकारात्मक कल दर्शवितो. त्या अनुषंगाने आपली तयारी अधिक चांगली असणे गरजेचे आहे,” असं पार्थसारथी मुखोपाध्याय म्हणाले. क्षमतेतील संभाव्य घट ही वर्षभरातील ऋतू विचारात न घेता अंदाजित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या