JOIN US
मराठी बातम्या / Explainer / Explainer: टेस्ट क्रिकेटसाठीच्या पिंक बॉलची निर्मिती कशी होते? चमक यावी म्हणून काय वापरतात माहीत आहे का?

Explainer: टेस्ट क्रिकेटसाठीच्या पिंक बॉलची निर्मिती कशी होते? चमक यावी म्हणून काय वापरतात माहीत आहे का?

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत (IND Vs ENG) अशा Pink Ball चा वापर झाला आहे. चमक आणि दृश्यमानता टिकवून ठेवण्यासाठी या पिंक बॉलमध्ये कसला थर देतात माहीत आहे का?

जाहिरात

Pink ball

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 मार्च : क्रिकेट सामन्यांमध्ये (Cricket Matches) आता पिंक बॉलचा (Pink Ball Test) वापर केला जाणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेत (IND Vs ENG) अशा गुलाबी बॉलचा वापर झाला आहे. चमक आणि दृश्यमानता टिकवून ठेवण्यासाठी या पिंक बॉलमध्ये लाखेचा अतिरिक्त थर वापरला जातो. बॉलची मैदानाच्या पृष्ठभागावर वेगवान हालचाल व्हावी, यासाठी लाखेचा कृत्रिम थर उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया या पिंक बॉलविषयी… द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 27 नोव्हेंबर 2015 ला ऑस्ट्रेलियातील एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय कसोटी मॅचमध्ये प्रथमच पिंक बॉलचा वापर करण्यात आला. त्यानंतर 16 डे-नाईट टेस्ट मॅचेसमध्ये (Day-Night Test Matches) पिंक बॉलचा वापर केला गेला, त्यापैकी दोन मॅचेस दोन दिवसांतच निकाली निघाल्या तर चार मॅचेस तीन दिवसांतच संपल्या. रेड, पिंक किंवा व्हाईट या सर्व क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या बॉल निर्मितीसाठी समान उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. बुचाच्या झाडाची साल, रबर आणि लोकर धाग्यापासून हे बॉल तयार केले जातात. बॉलला दिलेला रंग आणि फिनिशिंगमधील फरक कोणत्या बॉलचा वापर कोणत्या स्वरुपात केला जातो हे ठरवतात. चमक आणि दृश्यमानता टिकवून ठेवण्यासाठी पिंक बॉलमध्ये लाखेचा अतिरिक्त थर वापरला जातो. अहमदाबाद येथे झालेल्या भारतविरुध्द इंग्लडच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये वेगवान धावपट्टीमुळे 30 पैकी 21 बॉल्स हे रिजेक्ट (Reject) करण्यात आले. मेरठ येथील सॅन्सप्रायल्स ग्रीनलॅण्ड ही कंपनी बीसीसीआयची (BCCI) अधिकृत बॉल्स पुरवठादार आहे. अहमदाबाद येथील मॅचदरम्यान खेळाडूंना आलेल्या अनुभवाआधारे एसजी आता नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बॉलचा रंग टिकवून ठेवत त्यावरील चकाकी कमी करणार आहे.

   हे वाचा -   World Test Championship : ठरलं! या मैदानात होणार फायनल, गांगुलीकडून शिक्कामोर्तब

संबंधित बातम्या

याबाबत बीसीसीआयने बॉल्स उत्पादक कंपनीला सांगितले, की पिंक बॉलचा रंग कायम ठेवावा, जेणे करुन दृश्यमानतेवर परिणाम होणार नाही. त्याची शिवण ही खेळण्यायोग्य असावी. लाल बॉलच्या तुलनेत पिंक बॉल हा संध्याकाळी पडणारं दव लक्षात घेता अधिक काळ्या रंगाचा दिसतो. खेळपट्टीवरील पारंपरिक गवताचे आच्छादन बॉल मेंटेन ठेवते तसेच यामुळे वेगवान गोलंदाज प्रभावी ठरतो. परंतु, अहमदाबाद टेस्ट मॅचमध्ये ट्रॅक काहीसा वेगळा दिसला. यात दोन्ही संघातील स्पिनर्सनी 30 पैकी 28 विकेट्स घेतल्या. https://indianexpress.com/article/explained/the-pink-ball-in-cricket-7216977/ स्वानंद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या