JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / हॉलिवूडच्या अभिनेत्रींना याड लावेल असा मराठमोळ्या वैदेही परशुरामीचा नादखुळा लुक, नवीन हेअरकटनं वेधलं लक्ष

हॉलिवूडच्या अभिनेत्रींना याड लावेल असा मराठमोळ्या वैदेही परशुरामीचा नादखुळा लुक, नवीन हेअरकटनं वेधलं लक्ष

नवीन स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूट अभिनेत्री वैदेही परशुरामी सतत करत असते. यावेळी वैदेही नव्या हेअर स्टाइलसह चाहत्यांसमोर आली आहे. पाहा वैदेहीचा हा नवा लुक.

जाहिरात

हॉलिवूडच्या अभिनेत्रींना याड लावेल असा मराठमोळ्या वैदेही परशुरामीचा नादखुळा लुक, नवीन हेअरकटनं वेधलं लक्ष

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 मे:  मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ‘वैदेही परशुरामी’ (Vaidehi Parshurami) सध्या तिच्या ‘झोंबिवली’(Zombivli)   सिनेमामुळे चर्चेत आहे. वैदेहीने झोंबिवली या नवा जॉनर असलेल्या सिनेमात तिच्या साध्या, सरळ अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. वैदेही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.  नवीन स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोशूट वैदेही सतत शूट करत असते. वैदेहीच्या नॅचरल ब्यूटीवर तिचे चाहते कायम फिदा असतातच पण यावेळी वैदेही काहीशी नव्या लुकमध्ये चाहत्यांच्या समोर आली आहे. वैदेहीने तिचा हेअर कट केला असून तिच्या नव्या हेअरकटने सर्वांच लक्ष वेधलं. हॉलिवूड अभिनेत्रींनाही याड लावेल असे मराठमोळ्या वैदेहीचा नादखुळा लुक पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. ‘चेंज इज गुड’, असं म्हणत वैदेहीने नवा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने डॉल कट केला आहे. वैदेहीचं सौंदर्य या लुकमध्ये फारचं उठून दिसत आहे. वैदेहीने केवळ हेअर कट केलेला नाही तर तिने केसांना रेड कलरही केला आहे. रेड कलर आणि वैदेहीच्या गोऱ्या रंगांने चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळवून ठेवल्या आहेत. हेही वाचा - ब्लॅक ड्रेसमध्ये सेल्फी घेत Sonam Kapoorने शेअर केला बेबी बंप PHOTO

संबंधित बातम्या

वैदेहीच्या या नव्या लुकवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  ‘वैदेही तु डॉल आहेस’, असं एका युझरने म्हटलंय तर ‘प्रिटी बेबी’, ‘क्यूट’, ‘ब्यूटिफुल’, ‘अमेझिंग लुक’, अशा कमेंट करत वैदेहीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युझरने तर वैदेहीची तुलना अभिनेत्री जेनिलिया देशमुखसोबतच केली आहे. वैदेहीचा नुकताच आलेला झोंबिवली हा सिनेमा प्रेक्षकांनी चांगलाच डोक्यावर घेतला. झोंबींवर आधारीत मराठीतील हा पहिलाच सिनेमा होता. अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर, तृप्ती खामकर अशी तगडी स्टारकास्ट सिनेमात होती. सिनेमातील भूमिकेविषयी सांगताना वैदेहीने म्हटलं होतं, ‘मी सिनेमाची कथा वाचली तेव्हाच मी संकल्पनेच्या प्रेमात पडले होते. कोरोनामुळे सिनेमाच्या शुटींगमध्ये अनेक अडखळे आले होते. परंतु सिनेमाची प्रतिक्षा करण्यातही वेगळी मज्जा होती. सिनेमा सर्वांची मन जिंकून घेईल अशी मला खात्री आहे’. झोंबिवली सिनेमाने थिएटरमध्ये तगडी कमाई केल्यानंतर सिनेमा आता झी 5 या ओटीटी प्लॅटफॉकर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या