मुंबई, 26 जून- आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) सूत्रसंचालन करत असलेल्या ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) या कार्यक्रमाला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. काही दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा होममिनिस्टरचा नवा भाग ‘महामिनिस्टर’चा (Mahaminister) नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वालासुद्धा तितकीच लोकप्रियता मिळाली आहे. या पर्वात खास गोष्ट होती ती म्हणजे, 11 लाखांची पैठणी (11 Lakh’s Paithani). ही पैठणी कोण जिंकणार? कशी असणार? यासाठी सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान आता या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज पार पडणार आहे. 11 एप्रिलपासून या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं होतं. महामिनिस्टर असं त्या पर्वाचं नाव असून, दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होतो. या पर्वात विजेत्या महिलेला तब्बल 11 लाखांची पैठणी मिळणार आहे. हेच या पर्वाचं खास आकर्षण आहे. 11 लाखांच्या पैठणीमुळे कार्यक्रमाबद्दल बरीच उत्सुकता जागृत झाली होती आणि चर्चाही झाली होती. इतकंच नव्हे तर त्यावर टीकाही झाली होती.
आज या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा प्रसारित केला जाणार आहे.ही ११ लाखांची पैठणी कोणत्या महिलेला मिळणार? कोण या मोलाच्या पैठणीची मानकरी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, या पर्वाच्या विजेत्या रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे या बनल्या आहेत. आजचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र फारच उत्सुक आहेत. **(हे वाचा:** आकाश ठोसरने सायकलने गाठला पुणे ते लोणावळा पल्ला; अभिनेत्याने केला इतक्या तासांचा प्रवास ) 11 लाखांची पैठणी- ही 11 लाखांची पैठणी दिव्यांग कलाकारांनी (Specially Abled Artists) तयार केली आहे. नाशिकमधलं येवला (Yeola) हे पैठण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण. ही 11 लाखांची पैठणीदेखील येवल्यातच तयार झाली आहे; मात्र ती तयार केली आहे बोलता आणि ऐकता न येणाऱ्या कलाकारांनी. या पैठणीला अस्सल सोन्याची जर असेल आणि खऱ्या हिऱ्यांनीही ती चमचमत असेल; मात्र दिव्यांग कलाकारांच्या कौशल्यामुळे या पैठणीचं तेज आणखी वाढलं आहे.