JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विराट कोहली नाही तर हा क्रिकेटर आहे हृतिक रोशनचा मोस्ट फेवरेट Hrithik Roshan | Virat Kohli | MS Dhoni | World Cup 2019 |

विराट कोहली नाही तर हा क्रिकेटर आहे हृतिक रोशनचा मोस्ट फेवरेट Hrithik Roshan | Virat Kohli | MS Dhoni | World Cup 2019 |

Hrithik Roshan | Virat Kohli | MS Dhoni | World Cup 2019 | बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी सुपर ३० सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 जुलै- बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी सुपर ३० सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशनसाठीच हृतिक स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाइव्हमध्ये गेला होता. इथे त्याने स्वतःच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल सर्वांना सांगितले. हृतिक म्हणाला की, टीम इंडियामध्ये त्याला महेंद्रसिंग धोनी सर्वात जास्त आवडतो. महेंद्र फक्त एक चांगला खेळाडू नसून तो उत्तम शिक्षकही आहे. एवढंच नाही तर तो सर्वोत्कृष्ट क्रिकेटर, एक उत्तम शिक्षक यांसोबतच एमएस धोनी महान विचारकही आहे. World Cup- खास रोहित शर्माचं शतक पाहायला ही मराठमोळी अभिनेत्री गेली इंग्लंडला …म्हणून युवराज सिंगच्या पार्टीत अंगद बेदी- नेहा धुपिया दिसले नाहीत क्रिकेटचा लाइव्ह सामना पाहण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना हृतिक म्हणाला की, २०११ मध्ये तो भारत आणि इंग्लंडचा सामना पाहायला जाणार होता. मात्र काही कारणांमुळे तो जाऊ शकला नाही. मात्र काम संपवून तो शेवटच्या ओव्हरमध्ये स्टेडिअममध्ये पोहोचला होता आणि तेव्हा तो सामना टाय झाला होता. हृतिकच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर सुपर ३० हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद यांची व्यक्तिरेखा हृतिक रोशन साकारत आहेत. VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या