JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘The Kashmir Files' सोबत नागराज मंजुळेंच्या चित्रपटाची 'झुंड', निर्मात्याने खडा केला सवाल, काय आहे कारण?

‘The Kashmir Files' सोबत नागराज मंजुळेंच्या चित्रपटाची 'झुंड', निर्मात्याने खडा केला सवाल, काय आहे कारण?

मुंबई, 20 मार्च: सध्या सिनेसृष्टीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. . देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला. मात्र, 4 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाच्या निर्मात्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री केला तर आमचा झुंड का नाही, असा सवाल ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ( Jhund’s producer Savita Raj Hiremath) यांनी उपस्थित केला आहे.

जाहिरात

jhund tax free

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 मार्च: सध्या सिनेसृष्टीत विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. . देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला. मात्र, 4 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाच्या निर्मात्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री केला तर आमचा झुंड का नाही, असा सवाल ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ( Jhund’s producer Savita Raj Hiremath) यांनी उपस्थित केला आहे. निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी फेसबुकवर भली मोठी पोस्ट लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्ये द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री घोषित करण्यात आला आहे. या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली आहेत. झुंडनंतर आठवडाभराने विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला. या चित्रपटाला केंद्र आणि राज्य सरकारकडून साथ मिळाली आणि बऱ्याच राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला. झुंडच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. द काश्मीर फाईल्सप्रमाणेच झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, असं त्या म्हणाल्या. काय आहे सविता यांची फेसबुक पोस्ट ‘मी नुकताच द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेली काश्मिरी पंडितांची व्यथा ही हृदयद्रावक आहे. या कथेला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण झुंडची निर्माती म्हणून माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे आणि या चित्रपटातील संदेशाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं आहे की सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना टॅक्स फ्री करण्यास निवडते, त्याला सोशल मीडियावर प्रमोट करते आणि कार्यालयांना चित्रपट दाखवण्यास किंवा त्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यास सांगून त्याचं समर्थन करते. झुंड या चित्रपटाचाही विषय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. झुंड हा चित्रपट केवळ जात आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलत नाही, तर समाजातील खालच्या स्तरातील लोकांना यशाचा मार्ग शोधण्यास प्रेरणा देतो’, असं सविता यांनी लिहिलं. झुंड या चित्रपटाची नेमकी कथा काय? नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे. द काश्मीर फाईल्समध्ये काय दाखवण्यात आले आहे. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या