JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मृत्यूच्या काही तासापूर्वी कोणाच्या बर्थडे पार्टीत गेली होती आकांक्षा दुबे? व्हाट्सअॅप चॅटमधून होणार उलगडा

मृत्यूच्या काही तासापूर्वी कोणाच्या बर्थडे पार्टीत गेली होती आकांक्षा दुबे? व्हाट्सअॅप चॅटमधून होणार उलगडा

मृत्यूच्या काही तासापूर्वी आकांक्षा शनिवारी रात्री एका बर्थडे पार्टीत गेली होती. ही पार्टी कोणाची होती ?

जाहिरात

आकांक्षा शनिवारी रात्री एका बर्थडे पार्टीत गेली होती.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मार्च- भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Actress Aakanksha Dubey) रविवारी सकाळी वारणसीमध्ये एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्या करण्याच्या आधी आकांक्षा शनिवारी रात्री एका बर्थडे पार्टीत गेली होती. ही पार्टी कोणाची होती, याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही. आकांक्षाची मेखअप आर्टिस्ट रेखा मौर्यानं सांगितलं की, ती शनिवारी एका बर्थडे पार्टीत जाणार होती, असं म्हटली होती. पोलीस या प्रकरणाची सध्या चौकशी करत आहेत. एसीपी ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितलं की, तिचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच तिच्या कुटुंबाला याची माहिती दिली आहे. तसेच आकांक्षा हॉटेलच्या ज्या खोलीत राहिली होती, तिथं कोणतीच सुसाईट नोट सापडलेली नाही. अशा स्थितीध्ये एकच अंदाज लावला जात आहे की, तिच्या मोबाईल फोनमधून काहीतरी माहिती मिळू शकते. कारण पोलीस सध्या तिच्या व्हाट्सअॅप चॅट आणि मेसेजची देखील तपासणी करताना दिसत आहेत. या मेसेजमधून ती कोणत्या बर्थडे पार्टीला गेली होती याची माहिती मिळू शकते. या पर्टीत असं काय घडलं ज्यामुळं या अभिनेत्रीनं असं टोकाचं पाऊल उचललं. वाचा- ‘ती’ला पतीच्या जवळ पाहून भडकलेली रविना टंडन; भर पार्टीत राडा घालत केलेलं जखमी 24 तासापूर्वी केली होती ही शायरी पोस्ट आकांक्षा दुबेने तिच्या इन्स्टा स्टोरीला 23 तासापूर्वी एक शायरी पोस्ट केली होती. यामध्ये असं म्हटलं आहे की, राह देखेंगे तेरी चाहे जमाना लग जाए,या तो आ जाए तू या हम ही ठिकाने लग जाए…अशाप्रकारची शायरी तिनं पोस्ट केली होती. पोलीस तपास करत आहेत याप्रकरणाची तपास करणारे एसीपी म्हणाले की, सर्व प्रकरण पाहिल्यानंतर ही घटना आत्महत्या असल्याचे वाटत आहे. मात्र पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूनी चौकशी करत आहेत. तिची सोशल मीडिया पोस्ट असेल किंवा तिची बर्थडे पार्टी असेल, या सर्व प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. पण तिची मेकअप आर्टिस्ट म्हणाली की, शनिवारी रात्री ती पूर्णपणे ठीक होती. आज ती शुटींगसाठी देखील जाणार होती मात्र हॉटेलमध्ये ती मृत अवस्थेत आढळली.

संबंधित बातम्या

आकांक्षा दुबे तीन वर्षाची असताना आपल्या आई वडिलांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या आई- वडिलांचं तिला आयपीएस करण्याचं स्वप्न होत. मात्र तिला बालपणापासून नृत्याची व अभिनयाची आवड होती. शिवाय तिला टीव्ही पाहायला देखील आवडत होतं. तिची हिच आवड ओळखून ती सिनेमा इंडस्ट्रीत आली. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेनं मदत केली.

> मिळालेल्या माहितीनुसार, 17 व्या वर्षी आकांक्षा दुबेनं भोजपूरी सिनेमात पहिलं पाऊल ठेवलं. तिनं दिग्दर्शक आशी तिवारीसोबत काही सिनेमात काम केलं आहे. असं जरी असलं तरी तिला अनेकवेळा रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. आकांशा 2018 मध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं देखील सांगितलं जात आहे. यानंतर तिनं काही काळ सिनेमापासून लांब राहणं पसंद केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या