मुंबई, 6 जून- ‘द काश्मीर फाइल्स’ (the kashmir files) हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ 25 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीनी**(Vivek Agnihotri)** या चित्रपटाच्या सीक्वेलची **(the kashmir files sequel)**घोषणा करत शिवसेनेला (shivsena ) डिवचलं आहे. सध्या त्यांचे सूचक ट्वीट चांगलेच चर्तेत आलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या सीक्वेलची घो।षणा करत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, खूप साऱ्या दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लोक, कॉंग्रेस, आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसंच अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मिर फाईल्स 2’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा. विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलच चर्चेत आलं आहे. विवेक अग्निहोत्रीच्य़ा या ट्वीटनंतर शिवसेनेची प्रतिक्रिया नेमकी काय असणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या सिनेमावरून अनेक वाद निर्माण झाले. काहींनी या सिनेमाचे कौतुक केले तर काहींनी टीका केली.