JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : सारा अली खान म्हणते, 'मी विचित्र आहे कारण सैफ आणि अमृता...'

VIDEO : सारा अली खान म्हणते, 'मी विचित्र आहे कारण सैफ आणि अमृता...'

सोशल मीडियावर व्हायरल झालेला साराचा हा व्हिडीओ कॉफी विथ करण या शोमधील आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 एप्रिल : सध्या कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ज्यामुळे सध्या अनेक सेलिब्रेटी सुद्धा सिनेमा किंवा मालिकांचं शूटिंग थांबवून घरी थांबले आहेत. ज्यामुळे सध्या कोणत्याही टीव्ही चॅनेलवर जुन्या कार्यक्रमांचं प्रसारण सुरू झालं आहे. अशात अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती स्वतःला विचित्र म्हणताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला साराचा हा व्हिडीओ कॉफी विथ करण या शोमधील आहे. ज्यात तिनं मागच्या वर्षी वडील सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती. तिचा हा एपिसोड खूप लोकप्रिय सुद्धा झाला होता. करणच्या शोमध्ये पहिल्यांदाच हजेरी लावणाऱ्या सारानं खूपच धम्माल केली होती. त्यातीलच एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अजय नसता तर शाहरुखशी लग्न केलं असतं का? चाहत्याला कजोलचं बिनधास्त उत्तर या व्हिडीओमध्ये सारा स्वतःला विचित्र म्हणताना दिसत आहे. सारा म्हणते, सैफ अली खान आणि अमृता सिंह यांना एक मुलगी आहे आणि ती मुलगी मी आहे. हो मी विचित्र आहे. हे दोघंही खूप विचित्र आहेत. आम्ही सर्वच खूप विचित्र आहोत. म्हणजे असं की, जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा इंटरनेट ब्रेक करणार हे नक्की.

यावर करण तिला विचारतो, हे तेच आहे का जे तू सांगितलं होतं. त्यावर सारा म्हणते, हे असं काही आहे जे तुला सांगता येऊ शकतं. यानंतर करण जौहर तिला विचारतो तुला खरंच इंटरनेट ब्रेक करायचं आहे का? त्यावर सारा म्हणते का नाही? लॉकडाऊनमध्येही सलमानचे वडील वॉकसाठी जातात बाहेर, म्हणाले- मी एकटाच नाही… सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सारानं केदारनाथ सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. या सिनेमानंतर तिनं रणवीर सिंहसोबत सिंबा आणि कार्तिक आर्यनसोबत लव्ह आज कल केला. लव्ह आज कलच्या शूटिंग दरम्यान तिचं नाव कार्तिक सोबत जोडलं गेलं होतं. Lockdown दरम्यान टायगर-दिशा राहतायत लिव्ह इनमध्ये? कृष्णा श्रॉफनं सांगितलं सत्य

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या