JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इब्राहिम अली खानचा TikTok वर डेब्यू, VIDEO मध्ये उलगडली फॅमिली सीक्रेट्स

इब्राहिम अली खानचा TikTok वर डेब्यू, VIDEO मध्ये उलगडली फॅमिली सीक्रेट्स

सारानं इब्राहिमचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात साराच्या फॅमिलीची अनेक सीक्रेट्स उघड झाली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 एप्रिल : सारा अली खान लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती सतत काही ना काही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. असाच एक व्हिडीओ तिनं नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात साराच्या फॅमिलीची अनेक सीक्रेट्स उघड झाली आहेत. हा व्हिडीओ आहे साराचा भाऊ इब्राहिम खानच्या टिक-टॉकवरचा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला नवाब सैफची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इब्राहिम अली खाननं नुकताच टिक-टॉक डेब्यू केला. या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच इब्राहिम अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओत इब्राहिमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले तर लक्षात येत की तो सर्वच बाबतीत वडील सैफ अली खानची कार्बन कॉपी आहे. तो अगदी हूबेहुब सैफसारखाच हसतो. तसेच एखाद्या गोष्टींवर प्रतिक्रिया देताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आणि स्टाईल सेम सैफसारखीच आहे. सुशांत सिंह राजपूतसोबतच्या रिलेशनशिपवर रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन, म्हणाली…

सारा अली खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सारा आणि इब्राहिम आई अमृतासोबत कंप्युटर जनरेटेड आवाजात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहेत. हे प्रश्न पुढीलप्रमाणे… सर्वाधिक प्रसिद्ध कोण आहे? या प्रश्नवर तिघंही एकाचवेळी अमृता सिंहकडे इशारा करतात. सर्वात विचित्र कोण आहे? यावर इब्राहिम आणि अमृता साराकडे इशारा करतात. तर सारा सुरुवातीला आईकडे इशारा करते आणि मग ती मान्य करते ती स्वतःच सर्वात विचित्र आहे. शाळेत सर्वात चांगला अभ्यास कोणी केला? या प्रश्नावर सर्वजण एकत्र साराकडे बोट दाखवतात. सर्वात मस्तीखोर कोण आहे? या प्रश्नावर सारा आणि इब्राहिम दोघंही स्वतःकडेच इशारा करतात. तर अमृता गप्प राहणं पसंत करते. सर्वात विद्रोही कोण आहे? यावर सर्वजण साराकडे इशारा करतात. सर्वाधिक समस्या कोण निर्माण करतं? या प्रश्नावर सगळे इब्राहिमकडे बोट करतात. सर्वाधिक गॉसिप आणि तक्रार कोण करतं? यावर सारा इब्राहिमकडे आणि अमृता-इब्राहिम साराकडे इशारा करतात.

हा पहिला व्हिडीओ होता ज्यात इब्राहिम पहिल्यांदा अभिनय करताना दिसला. इब्राहिम बद्दल बोलायचं तर त्याला अभिनयापेक्षा क्रिकेटची जास्त आवड आहे. त्यामुळे तोच खरा पतौडी खानदानाचा वारसदार आहे असं एकदा त्याच्या आजी शर्मिला टगोर यांनी एका मुलाखतीत गंमतीनं म्हटलं होतं. राखी सावंतनं 8 महिन्यांनंतर शेअर केला लग्नाचा फोटो, नवराही दिसला सोबत Lockdown Effect : ‘पंचनामा’ फेम अभिनेत्रीनं चक्क किचनमध्ये केलं BOLD फोटोशूट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या