JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / भयानक स्टंट ! अभिनेता विद्युत जामवालचा नवीन व्हिडीओ व्हायरल

भयानक स्टंट ! अभिनेता विद्युत जामवालचा नवीन व्हिडीओ व्हायरल

Vidyut Jamwal त्याच्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै : अभिनेता जॅकी चॅन हे सध्या जगभरातील ओळखीचं नाव आहे. लहान मुलापासू ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना सर्वांनाच हे नाव माहित आहे. त्यांचा स्वतःचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. या बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेता विद्युत जामवाल त्यापैकीच एक आहे. सिने जगतात जॅकी चॅन यांचं फार मोठं योगदान आहे. सध्या ते वयोमानमुळे सिनेमांमध्ये फारसे दिसत नसले तरीही 2015 पासून प्रत्येक वर्षी ते जॅकी चॅन इंटरनॅशनल अ‍ॅक्शन फेस्टिव्हल आयोजित करतात. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अ‍ॅक्शन फिल्म निर्मात्यांना सन्मानित केलं जातं. यावर्षी  हे फेस्टिव्हल 21 ते 27 जुलै पर्यंत होणार आहे. वेब सीरिजमधील बोल्ड सीननंतर प्रिया बापटनं केलं हटके फोटोशूट बॉलिवूडमध्ये जॅकी चॅनच्या चाहत्यांपैकी अभिनेता विद्युत जामवाल एक आहे. त्यांच्या यंदाच्या या फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या आहेत. विद्युतनं थोड्या हटके स्टाइलमध्ये या फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या. विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टंट व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये विद्युतनं जो स्टंट केला आहे तो पाहिल्यावर कदाचित तुम्हाला तो खूप सोप्पा वाटेलही पण तो अजिबात सोप्पा नाही. फिटनेस टिप्स : प्रेग्नंसीनंतर अभिनेत्री सौम्या टंडननं असं केलं वजन कमी या व्हिडिओमध्ये विद्युत, हातात अंडे घेऊन सुरुवातीला एक नंतर दोन अणि शेवटी तीन अशा विटा तोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विद्युतनं यंदाच्या जॅकी चॅन फस्टिव्हलला हजेरी लावणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. विद्युत त्याच्या अ‍ॅक्शनसाठी ओळखला जातो. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हिडिओवरून विद्युत जॅकी चॅनचा किती मोठा चाहता आहे हे लक्षात येतं. तसेच विद्युत या फेस्टिव्हलला जाणार असल्यानं आता त्याच्या चाहत्यांना जॅकी चॅनसोबतच्या त्याच्या फोटोची उत्सुकता असणार आहे. विद्युतनं शेवटचं जंगली या सिनेमात काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी तो अनोख्या पद्धतीनं बॉटल कॅप चॅलेज पूर्ण केल्यानं चर्चेत आला होता. त्यानं एकाच वेळी तीन बॉटल्सचं झाकण उघडून हे चॅलेंज पूर्ण केलं होतं. सध्या विद्युत कमांडो सीरिजमधील ‘कमांडो 3’ची तयारी करत आहे. OMG! पैशांसाठी बहिणीचे फोटो विकायचा सनी लिओनीचा भाऊ ================================================================= SPECIAL REPORT: विहीर नाही तर पाणी चोरीला गेलं; ग्रामस्थांवर राखण करण्याची वेळ

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या