मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नेहमीच आपल्या रोखठोक आणि बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. ती नेहमीच अभिनेत्री केंद्रित भूमिका असलेले चित्रपट निवडते. कारण अभिनेत्रीला आपला चित्रपट हिट करण्यासाठी कोणत्याही हिट अभिनेत्याचीच गरज असते असं नाहीय. हे तिचं मत आहे. ती सतत यावर व्यक्तसुद्धा होत असते. त्यामुळे ती सतत चर्चेत असते.नुकतंच अभिनेत्रीने पुन्हा एकदा बॉलिवूडवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. विद्या बालनने नुकतंच अभिनेत्रीबद्दल बोलल्या जाणार्या सर्व निरुपयोगी गोष्टींबद्दल सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की, तिला बऱ्याचवेळा सांगितलं जातं की, तिच्या करिअरच्या या टप्प्यावर ‘रेट रेस’चा तिच्यासाठी काहीच अर्थ नाहीय. तिला असंही सांगण्यात आलं की ती कठोर परिश्रम करत आहे, कारण तिला तिचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. कारण अभिनेत्रीची शेल्फ लाइफ कमी आहे. असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. विद्या बालन ही एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अनेक दमदार भूमिका साकारत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सतत अभिनेत्री केंद्रित भूमिका साकारण्यावर भर देत असते. विद्याने 2005 मध्ये संजय दत्त आणि सैफ अली खान स्टारर ‘परिणीता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली होती. त्यानंतर विद्याने ‘लगे रहो मुन्ना भाई’ (2006), ‘भूल भुलैया’ (2007), ‘द डर्टी पिक्चर’ (2011), ‘मिशन मंगल’ (2019) आणि ‘शकुंतला देवी’ (2020) यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. . विद्याची अभिनय कारकीर्द फारच सुंदर आहे. ती फक्त निवडक चित्रपटांमध्ये काम करते.परंतु ती म्हणते की, तिला जे दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या चित्रपटात घेऊ इच्छितात तिला अजूनही त्यांच्या काही विचित्र मागण्यांचा किंवा कमेंट्सचा सामना करावा लागतो. **(हे वाचा:** Kareena Kapoor: तिसऱ्या प्रेग्नन्सीबाबत व्यक्त झाली करीना कपूर, वहिनी आलिया भट्टबाबत म्हणाली… ) फिल्म कंपेनियनने शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, विद्या अभिनेत्रींना सांगितलेल्या काही ‘हास्यास्पद, निरुपयोगी गोष्टींबद्दल बोलतताना दिसत आहे. विद्या म्हणाली की, तिला सांगण्यात आलं आहे की, ‘आम्हाला तुझ्या जास्त तारखांची गरज नाही, पण तुझी भूमिका खूप महत्त्वाची आहे. हिरोच्या प्रवासात तू उत्प्रेरकाची भूमिका साकारत आहेस’. असं म्हणत अभिनेत्रींना अजूनही दुय्यम स्थान देणाऱ्या निर्माता आणि दिग्दर्शकांवर तिने आपली नाराजी व्यक्ती केली आहे.