JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Katrina Kaif: 'विकीमुळे मला चांगली झोप येते'; कतरिनाने उघड केलं बेडरूम सिक्रेट

Katrina Kaif: 'विकीमुळे मला चांगली झोप येते'; कतरिनाने उघड केलं बेडरूम सिक्रेट

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आता आपल्या वैवाहिक आयुष्यामुळेदेखील आता अनेकदा चर्चेत असतात. अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात पती-अभिनेता विकी कौशल किंवा सासरच्यांचा उल्लेख करत असते.

जाहिरात

कतरिना-विकी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑक्टोबर-   बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आता आपल्या वैवाहिक आयुष्यामुळेदेखील आता अनेकदा चर्चेत असतात. अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात पती-अभिनेता विकी कौशल किंवा सासरच्यांचा उल्लेख करत असते. कधी-कधी ती तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टीही सांगते. तर बऱ्याच मुलाखतींमध्ये विकीकौशल सुद्धा पत्नी-अभिनेत्री कतरिना कैफचं कौतुक करतांना दिसून येतो. नुकतंच दिवाळीत लक्ष्मी पूजनच्यावेळी विकीने कतरिनाला आपल्या घरातील लक्ष्मी म्हणून संबोधलं होतं. तर आता कतरिनाने एका मुलाखतीत पती विकी कौशलचं कौतुक करत काही गोष्टी उघड केल्या आहेत. पाहूया अभिनेत्रीने नेमकं काय म्हटलंय. लग्नानंतर कतरिना कैफ आपल्या व्यावसायिक आयुष्यात पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. ती आपल्या विविध प्रोजेक्ट्स शूटिंग करत आहे. सध्या कतरिना कैफ तिच्या आगामी ‘फोन भूत’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. अभिनेत्री कधी ‘बिग बॉस’ तर कधी कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, कतरिनाने पती विकी कौशलशी संबंधित अनेक मजेदार गोष्टीही शेअर केल्या आहेत. ‘पिंकव्हीला’शी नुकत्याच झालेल्या संवादात तिने विकी कौशलच्या चांगल्या सवयीबद्दल सांगितलं आहे. कतरिनाच्या म्हणण्यानुसार, विकी जसा डान्स आणि गाण्याने आनंदी होतो, तशीच कतरिनाही खूप आनंदी होते. **(हे वाचा:** Diwali Look 2022: कतरिना कैफच्या लुकची जोरदार चर्चा; अभिनेत्रीने दिवाळीला नेसली इतकी महागडी साडी ) यावेळी पिंकव्हीलासोबत बोलताना कतरिना म्हणाली की, ‘जेव्हा मला झोप येत नाही, विकी माझ्यासाठी गाणं गातो आणि डान्स करतो, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे.इतकंच नव्हे तर तो जेव्हा गातो तेव्हा तो क्षणही खूप सुंदर असतो. खरं सांगायचं तर तो खूप चांगला गायक आहे. जेव्हा मला झोप येत नाही, तेव्हा मी त्यांला गाणं गाण्यास सांगते." मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकीकडे कतरिना कैफला तिचा पती विकी कौशलचा डान्स आणि गायनाबद्दलचा सर्वात चांगला मुद्दा वाटतो. तर अभिनेत्रीला विकीची सर्वात वाईट गोष्ट तिचा हट्ट असल्याचं ती सांगते. कतरिनाने सांगितलं की, विकी खूप हट्टी आहे. जेव्हा तो त्याच्या निर्णयावर ठाम राहतो तेव्हा कोणीही त्याचा निर्णय बदलू शकत नाही. कतरिना पुढे सांगते की, विकी वजन कमी करण्याचा निर्णय खूप लवकर घेतो आणि तो तसं करतोही.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडते. या लग्नामुळे कतरिना किती खूश आहे हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसते. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे कतरिना कुठेही गेली तरी तिचा नवरा विकी कोशल आणि सासरचा उल्लेख नक्कीच करते. तसंच, विकी कौशलदेखील पत्नी कतरिनाला खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. कतरिना आणि विकीने राजस्थानमधील बारवाडा येथे शाही थाटामाटात लग्न केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या