JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Malayalam Actor Innocent Death: आधी कोरोनानं ग्रासलं आणि नंतर... ज्येष्ठ अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Malayalam Actor Innocent Death: आधी कोरोनानं ग्रासलं आणि नंतर... ज्येष्ठ अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Malayalam Actor Innocent Death माजी खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते इनोसेंट यांचं निधन झालं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना अखेरचा श्वास घेतला.

जाहिरात

veteran malayalam actor and former lok sabha mp innocent passed away kerala

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोची : माजी खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते इनोसेंट यांचं निधन झालं. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय 75 वर्ष होतं. त्यांच्यावर कोची इथे उपचार सुरू होते. हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांच्या मृत्यूमागचं कारण कोरोना असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. माजी खासदार आणि ज्येष्ठ मल्याळम अभिनेते इनोसंट वरीद थेक्केथाला यांचं निधन झालं. केरळमधील कोची येथील खासगी रुग्णालयात रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार त्यांना कोरोना संसर्ग, श्वसनाचे आजार झाला होता. त्याच दरम्यान त्यांचे शरीरातील एक एक अवयव काम करायचे बंद होऊ लागले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

संबंधित बातम्या

3 मार्च रोजी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वीपीएस लेकशोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते आणि राजकीय नेते प्रार्थना करत होते. इनोसेंट यांनी याआधी कॅन्सरवर मात केली होती. काही काळापासून आजारी होते. 3 मार्चला त्यांना श्वासोच्छवास आणि अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2012 मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाली. 2015 मध्ये, त्याने कर्करोगातून बरं झाल्याचं सांगितलं. 3 मार्च पासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी रविवारी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांचा जाण्याने कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या