JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मेट्रोमध्ये केलेल्या 'या' कृत्यानं वरुण-कियारा ट्रोल, VIDEO पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

मेट्रोमध्ये केलेल्या 'या' कृत्यानं वरुण-कियारा ट्रोल, VIDEO पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

‘जुग जुग जियो’ च्या टीमनं मंगळवारी मेट्रोमध्ये प्रवास केला. मेट्रोमध्ये केलेल्या कृत्यानं सध्या ‘जुग जुग जियो’ टीम ट्रोल होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 जून : अभिनेता वरुण धवन **(Actor Varun Dhawan)**आणि अभिनेत्री कियारा अडवाणी **(Kiara Adwani)**त्यांचा आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत  (Promotion of jugjug jeeyo movie). त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच सध्या ते आणखी एक कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘जुग जुग जियो’ च्या टीमनं मंगळवारी मेट्रोमध्ये प्रवास केला. यावरुन ते जोरदार ट्रोल **(Trolling)**होत आहेत. ‘जुग जुग जियो’ च्या प्रमोशनचा एक भाग म्हणून चित्रपटाच्या टीमनं मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी वडापाव खाल्ला. मेट्रोमध्ये खाल्ल्यामुळे सध्या त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मेट्रोच्या आत खाण्याला परवानगी नसून दोघांनीही मेट्रोत खाल्ल्यानं या व्हिडिओवर यूजर्स नाराजी व्यक्त केली आहे. कमेंट करत यूजर्सनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

आम्ही पण मेट्रोमध्ये खाल्लं तर चालेल का?, असा प्रश्नही यूजर्सनं केला आहे. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला पाहिजे,सेलिब्रिटींसाठी वेगळे नियम आणि सामान्यांसाठी वेगळे? लवकरात लवकर दंड झाला पाहिजे, असं म्हणत युजर्सनी मुंबई मेट्रोला टॅग करून आपला संताप व्यक्त केला आहे. वाचा- महिमानं कॅन्सरवर कुठे घेतले उपचार व कुणी केली मदत? Video शेअर करत म्हणाली.. ‘जुग जुग जियो’ 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कियारा आणि वरुणशिवाय या चित्रपटात मनीष पॉल, प्राजक्ता कोहली, अनिल कपूर, नीतू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वरुण धवन, किआरा अडवानी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी अशा मोठ्या स्टारकास्टने भरलेला हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करणारा असणार याबद्दल शंका नाही. त्यामुळे चित्रपट किती चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या