मुंबई, 20 मार्च : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Bollywood Actor Varun Dhawan) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात वरुण यशस्वी ठरला आहे. सध्या वरुण दक्षिणात्य सिनेसृष्टीतल्या (South Film Industry) दिग्दर्शकासोबत एका दक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे. याविषयीची माहिती ‘बॉलिवूड लाईफ डॉट कॉम’ने दिली आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वरुणने ‘मै तेरा हिरो’, ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बदलापूर’, ‘एबीसीडी 2’, ‘कुली नं. 1’, ‘जुडवा 2’, ‘दिलवाले’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’, ‘कलंक’, ‘स्ट्रीट डान्सर 3D’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या भूमिकांचं विशेष कौतुक देखील झालं आहे. सोशल मीडियावर (Social Media) वरुणचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्याच्या पोस्ट देखील नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता तो प्रसिद्ध साउथ दिग्दर्शकासोबत काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या या आगामी प्रोजेक्ट बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लवकरच दिग्दर्शक नीतेश तिवारीच्या पुढच्या चित्रपटासाठी शुटिंग करणार आहे. वरुण धवनच्या आगामी चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर, नीतेश तिवारीच्या चित्रपटाव्यतिरिक्त वरुणचे अजून दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. `जुग जुग जियो` या आगामी चित्रपटात वरुण अनिल कपूर, नीतू कपूर आणि कियारा अडवाणीसह दिसेल. तसेच `भेडिया` या चित्रपटात तो क्रिती सेनन सोबत झळकणार आहे. ( इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात! बंडखोरांनंतर आता बिलावल भुत्तो यांच्याकडून धमकी ) दरम्यान, एका चित्रपटासाठी तो दक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (Atlee) यांच्यासोबत बोलणी करत असल्याची चर्चा आहे. `ई टाईम्स`ने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण धवन आणि एटली यांची भेट झाली असून, हे दोघं लवकरच एका साउथ चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी (Hindi Remake) एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट विजय आणि समंथा यांचा `थेरी (Theri)` हा चित्रपट असण्याची शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी एटलीच्या चित्रपटाच्या रिमेकसाठी वरुण धवनशी संपर्क साधण्यात आला होता, असं वृत्त होतं. यानंतर `थेरी`चा रिमेक होणार असं वाटत होतं. दिग्दर्शक एटली सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) सोबत काम करत आहे. जर सर्व काही ठिक झाले तर एटली वरुण धवनसोबत त्याच्या चित्रपटासाठी काम करण्यास सुरुवात करेल. ``शाहरुख खानसोबत सुरु असलेल्या चित्रपटाचे शुटींग पूर्ण केल्यानंतर मी वरुण धवनसोबत नव्या चित्रपटाचं काम सुरु करेल,`` असं एटलीने यापूर्वी स्पष्टपणे सांगितले आहे. या चर्चेमुळे फॅन्सची उत्सुकता मात्र कमालीची वाढली आहे.