उर्वशी रौतेला
मुंबई, 03 जानेवारी: अभिनेत्री मॉडेल उर्वशी रौतेला मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. क्रिकेटर ऋषभ पंत च्या अपघातानंतर तिची सर्वाधिक चर्चा होतेय. ऋषभ आणि उर्वशी यांच्या नात्याची सातत्यानं होत असते. सोशल मीडियावर दोघांच्या अफेर्सच्या चर्चा देखील रंगत असतात. उर्वशीला नेहमीच ऋषभ पंतच्या नावानं ट्रोल केलं जातं. ऋषभचा अपघात झाल्यानं उर्वशीनं मी तुला भेटायला येईन असं काळजीनं म्हटलं. मात्र एकीकडे काळजी आणि दुसरीकडे उर्वशी दुबईमध्ये पार्टी एन्जॉय करताना दिसली. उर्वशीचा बर्थ डे पार्टीतील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्वशीला चांगलंच ट्रोल देखील केलं आहे. उर्वशी नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी दुबईला गेली आहे. तिच्याबरोबर तिचे आई वडील देखील आहेत. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी उर्वशीच्या आईचा वाढदिवस होता. आईचा वाढदिवस उर्वशीनं दणकूण साजरा केला. आईच्या बर्थ डेचा केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. दुबईच्या उंच टॉवरच्या टॅरेसवर उर्वशीनं आईचा बर्थ डे सेलिब्रेट केला. हेही वाचा - Rishabh Pant Car Accident :BMW ला प्रचंड गती आणि एका सेकंदात….ऋषभ पंतच्या अपघाताचा LIVE VIDEO उर्वशीचं बर्थ डे सेलिब्रेशन पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची चांगलीच शाळा घेतली. ‘पंतला भेटायला तू हॉस्पिटलमध्ये येणार होतीन ना? आता पार्टी करतेस’, असं म्हणत अनेकांनी टोमणे मारले आहेत. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘ऋषभ दादाबद्दल तुला काहीच टेंशन नाहीये का?’ तर आणखी एका युझरनं म्हटलंय, ‘तिथे पंत हॉस्पिटलमध्ये आहे आणि मॅडम सिंहासनावर बसल्या आहेत’.
ऋषभ पंतचा अपघात झाला तेव्हा उर्वशीनं पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, ‘त्यांना बरं वाटावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन’. त्याचप्रमाणे उर्वशीच्या आईनं देखील ऋषभसाठी प्रार्थना केली. उर्वशीच्या आईनं मीरा रौतेलानं म्हटलं, ‘सोशल मीडियावरील अफवा एकीकडे आणि तुम्ही ठिक होऊन उत्तराखंडचं नाव रोशन करणं एकीकडे. सिद्धबलिबाबांची तुमच्यावर विशेष कृपा असू देत’. आधी ऋषभसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केल्यानं नेटकऱ्यांनी माय लेकींना चांगलंच ट्रोल केलं आहे.
क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात असताना अचानक कारवरचं नियंत्रण सुटलं आणि डिव्हायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला आणि आगीचे लोळ उठले. या ऋषभ गंभीररित्या जखमी झाला. योग्यवेळी मिळालेल्या उपचारांमुळे ऋषभ मरणाच्या दारातून परत आला.