मुंबई, 24 मार्च : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच सेलिब्रेटी होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पण तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व सेलिब्रेटी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. सतत आपल्या चाहत्यांना घरी राहण्याचा आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. मात्र अशातही अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या हॉट व्हिडीओमुळे चर्चेत आहे. उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती बिकिनीमध्ये समुद्रात आंघोळ करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हा व्हिडीओ खरं तर खूप जुना आहे. मात्र उर्वशी सध्या होम क्वारंटाईनच्या काळात तिचे जुने दिवस आठवत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, Me taking bath in quarantine like. कोणी घासली भांडी तर कोणी पुसली फरशी, Corornavirus नं अशी लावली सेलिब्रेटींची वाट
उर्वशीचा हा व्हिडीओ जुना असला तरीहीचे तिचे चाहत्यांमध्ये सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमधील तिच्या अदांवर तर सर्व घायाळ झालेले पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये ती समुद्राच्या पाण्यात धम्माल मस्ती करताना दिसत आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत अली-रिचा, शेअर केला रोमँटिक Video
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असेलेली पाहायला मिळते. तिचे ग्लॅमसर आणि स्टनिंग फोटोशूट अनेकदा व्हायरल होत असतात. याशिवाय तिचे फिटनेस व्हिडीओ सुद्धा खूप व्हायरल होत असतात. अनेक सिनेमात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. पण यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावं लागलं आहे. पण तिनं ट्रोलर्सना सडेतोड उत्तरही दिलं आहे. श्रुती हसनच्या घरात पडली फूट? वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत कुटुंबीय