JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urmila Nimbalkar : 'उर्मिला मात्र संपुर्ण बदलून गेलीय'; नेमकं कशाबाबत बोलतेय मराठमोळी अभिनेत्री?

Urmila Nimbalkar : 'उर्मिला मात्र संपुर्ण बदलून गेलीय'; नेमकं कशाबाबत बोलतेय मराठमोळी अभिनेत्री?

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

जाहिरात

Urmila Nimbalkar

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 सप्टेंबर : प्रसिद्ध मराठी यूट्यूबर म्हणून आपली नवी ओळख बनवणारी अभिनेत्री म्हणजेच उर्मिला निंबाळकर. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगी तिची चाहती आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.  आपल्या सहज सुंदर बोलण्याच्या आणि सांगण्याच्या शैलीनं उर्मिलानं सगळ्यांची मनं जिंकली. उर्मिला आज अनेक मुलींसाठी, आयांसाठी इन्स्पिरेशन बनली आहे. आता उर्मिला आई झाली आहे, तेव्हापासून ती आई होण्याचा आणि झाल्यानंतरच प्रवास मोकळेपणाने शेअर करते.  उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. नेहमीच आपल्या नवनवीन पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. बऱ्याचवेळा आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ती विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असते. आता तिने तिच्या आईपणाविषयी एक पोस्ट केली आहे. उर्मिलानं अथांगच्या जन्मानंतर स्वत:ला चांगलंच फिट ठेवलं आहे. तिच्या आरोग्याकडे ती विशेष लक्ष देताना दिसते. तसेच ती आईपणाची प्रवास देखील सांगते. ती या पोस्टमध्ये म्हणतेय कि, ‘‘फक्त वजन पुर्वपदावर आलंय. उर्मिला मात्र संपुर्ण बदलून गेलीय. आई होणं म्हणजे स्त्रीचा नविन जन्म होणं’, असं का म्हणतात, याची उकल फक्त आई झाल्यावरच होते. तोपर्यंत मजेशीर गोष्ट म्हणजे, अथांग आणि मला एकाच वेळी दात येतायत. अथांगचे दूधाचे दात तर माझी अक्कल दाढ. आई झाल्यावर लईच अक्कल लावावी लागते, तीही दिलीय आता देवाने’’

संबंधित बातम्या

याबरोबरच येणाऱ्या काळात उर्मिलाने अथांगच्या जन्मानंतर वाढलेलं वजन कसं कमी केलं याबद्दल व्हिडीओ बनवणार असल्याची देखील माहिती दिली आहे. उर्मिलाने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये ती अगदी कॉलेज गर्ल दिसतेय. पिंक कलरचा स्वेट शर्ट आणि शॉर्ट स्कर्टमध्ये उर्मिला दहा वर्ष तरुण दिसत आहे. हेही वाचा - Maharashtra Shahir : केदार शिंदेंच्या लेकीचं ‘महाराष्ट्र शाहीर’मधून सिनेसृष्टीत पदार्पण; समोर आला फर्स्ट लुक उर्मिलाचं आई झाल्यांनंतरच हे रूप पाहून चाहते खुश झाले आहेत. ते म्हणतायत कि,‘उर्मिला तू आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहेस’, ‘तुझ्या प्रत्येक व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो’ अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान उर्मिलाचे नवीन वेटलॉसवर आधारित येणारे व्हिडीओ नवीन आया झालेल्या सगळ्यांना खूपच उपयोगी ठरणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या