JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्रीनं आपलं स्वप्न केलं साकार; ठरली स्वतः चा स्टुडिओ थाटणारी पहिली मराठी युट्यूबर

अभिनेत्रीनं आपलं स्वप्न केलं साकार; ठरली स्वतः चा स्टुडिओ थाटणारी पहिली मराठी युट्यूबर

ही एक उत्तम अभिनेत्री आहे. ती काही हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठमोळी उर्मिला निंबाळकर फक्त एक गुणी अभिनेत्रीच नव्हे तर एक लोकप्रिय युट्युबरसुद्धा आहे. ती सतत आपल्या व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. तब्बल चार वर्षानंतर आज उर्मिला निंबाळकरचं मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. अभिनेत्रीने स्वतः चं एक युट्युब स्टुडिओ बनवलं आहे. इतकंच नव्हे तर त्यामध्ये आपलं पहिलं शूटदेखील पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने एक सुंदर पोस्ट लिहत याची माहिती दिली आहे. उर्मिला निंबाळकर ही ही एक उत्तम अभिनेत्री आहे. ती काही हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली आहे. सोबतच अभिनेत्री आपलं स्वतः चं युट्युब चॅनेलदेखील चालवते. तिला खरी ओळख युट्युब चॅनेलने मिळवून दिली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. या चॅनेलवर ती आपल्या पतीसोबत विविध विषय हाताळत असते. उर्मिला नेहमीच महिला आणि मुलींसाठी फॅशन, मेकअप,लाइफस्टाइल,हेल्थ,मॅरेज लाईफ, मातृत्व अशा विविध विषयांवर साध्या-सोप्या भाषेत भन्नाट माहिती देत असते. त्यामुळे तरुणाईत तिची प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्रीने नुकतंच एक पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे तिचे चाहतेदेखील प्रचंड आनंदी आहेत. आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्रीने पोस्ट लिहत म्हटलंय, ‘‘Finally……. आपला स्वतःचा युट्यूब स्टुडीओ बांधून झाला आणि तिथे पहिलं शूटही झालं. चार वर्षापूर्वी मोबाइलवर घरातल्या हॅालमध्ये आमच्या युट्यूब प्रवासाची सुरवात झाली. तेव्हा लाईट नव्हते, माइकचं बजेट नव्हतं, त्यामुळे बाहेरचा प्रकाश असेपर्यंत पण गोंगाट सुरू व्हायच्या आधी शूटींग पूर्ण करण्याची घाई असायची.

संबंधित बातम्या

**(**हे वाचा:‘ आशियातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं ‘Daagdi Chaawl 2’ चं पोस्टर’, VIDEO तुफान VIRAL ) अभिनेत्रीने पुढं म्हटलंय, ‘दर महिन्याला असं वाटायचं की बंद करूयात चॅनेल, नाही मिळतंय म्हणावा तसा प्रतिसाद. पण दोघं एकमेकांना push करत राहीलो की अजून तीन महिने करू, मग जाऊदे बंद करू चॅनल. स्वतःच्याच चुकांमधून शिकत, विषयांशी, प्रेक्षकांशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहून काम करत राहीलो आणि मग - “लोग साथ आते गए और कारवां बनता गया”. आता स्वतःचीच जागा आहे, बरोबर हुशार लोकांची साथ आहे, आता अजून कमाल काम करता येईल. अतिशय गोंडस बाळ, प्रेमळ पार्टनर, देखणं घर, कष्टाळू टीम, जीवनविद्येचं @jeevanvidyaofficial नॅालेज आणि काय हवं?……‘‘My heart is full of Gratitude ♥️and Ready to work hard🙏🏼…………’’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या