JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / OMG!उर्फीला रेस्टॉरंटच्या दारातच थांबवलं, अभिनेत्रीचा बाहेरच धिंगाणा, नेमकं काय घडलं?

OMG!उर्फीला रेस्टॉरंटच्या दारातच थांबवलं, अभिनेत्रीचा बाहेरच धिंगाणा, नेमकं काय घडलं?

Urfi Javed Controversies: उर्फी जावेदला कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हटलं जात आहे. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद नेहेमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते.

जाहिरात

उर्फी जावेदला रेस्टोरंटमध्ये दिला नाही प्रवेश

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 एप्रिल- उर्फी जावेदला कॉंट्रोव्हर्सी क्वीन म्हटलं जात आहे. अभिनेत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्फी जावेद नेहेमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. अति ग्लॅमरस कपड्यांमुळे उर्फीला अनेकवेळा वादाला सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावर सतत लोक तिला ट्रोल करत असतात. परंतु उर्फी नेटकऱ्यांना न जुमानता स्वतःला हवं तसं राहण्याचा प्रयत्न करते. दरम्यान आता उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फीला एका रेस्टोरंटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. यावरुन अभिनेत्रीने चांगलाच गोंधळ घातला आहे. उर्फी जावेद आपल्या अभिनय कारकिर्दीपेक्षा जास्त आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फीने अनेकवेळा बोल्डनेसच्या सीमा ओलांडत ग्लॅमरस ड्रेस परिधान केले आहेत. यावरुन अनेकवेळा वाद निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांनीसुद्धा उर्फीच्या या वागण्याला विरोध केला होता. परंतु उर्फी सर्वांनाच सडेतोड उत्तरं देत आपल्या अंदाजात कपडे परिधान करते. परंतु नुकतंच उर्फीसोबत असं काही घडलं, जे पाहून आता मात्र उर्फी चांगलीच भडकली आहे. (हे वाचा: हिंदीमध्ये संवाद साधणाऱ्या पत्नीला A R Rehman यांनी भर पुरस्कार सोहळ्यात थांबवलं, VIDEO होतोय VIRAL ) टेलीचक्करने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद दिसून येत आहे. पापाराझींसोबत नेहमीच चेष्टामस्करी करत कूल अंदाजात दिसणारी उर्फी, या व्हिडीओमध्ये मात्र काहीशी भडकलेली दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर ती या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीसोबत जोरदार वाद घालत आहे. हे नेमकं काय चाललंय? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. तर याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो. उर्फी जावेद नेहमीप्रमाणे आपल्या अतरंगी कपड्यांमध्ये मुंबईतील एका रेस्टोरंटमध्ये पोहोचली होती. परंतु अभिनेत्रीला दारातच अडवण्यात आलं. आणि ती अशा कपड्यांमध्ये आत प्रवेश करु शकत नाही असं सांगण्यात आलं. हे ऐकून उर्फी प्रचंड भडकली. आणि त्या रेस्टोरंटच्या मॅनेजरसोबत वाद घालू लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

यामध्ये मॅनेजर उर्फीला सांगत आहे, ‘मॅडम तुम्ही अशा कपड्यांमध्ये आत जाऊ शकत नाही. यावर भडकलेल्या उर्फी जावेदने वाद घालत संताप व्यक्त केला. उर्फी जोरजोरात ओरडत म्हणते, मी कोण आहे माहितेय का? माझं नाव उर्फी आहे उर्फी. जाऊन आत सांगा उर्फी जावेद आलीय.अशा शब्दांत उर्फी वाद घालताना दिसून येत आहे. यावर मॅनेजर उर्फीला शांत राहण्याची विनंती करत आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर आता संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या