मुंबई 07 ऑगस्ट: फॅशन जगतात तिच्या अफाट स्टाईलने लोकप्रिय झालेली उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. पण सध्या टीव्ही जगतातील एका लोकप्रिय अभिनेत्रीशी उर्फीचं सोशल मीडिया वॉर चालू असल्याचं दिसून आलं आहे. टीव्ही जगतात लोकप्रिय असणारी अभिनेत्री (urfi javed chahat khanna) चाहत खन्नाने उर्फीच्या एका आउटफिटवर कमेंट करत एक भलीमोठी इंटस्ग्राम स्टोरी शेअर केली आणि त्यानंतर या दोन्ही अभिनेत्रींनमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाल्याचं समोर आलं आहे. कुठून झाली वादाला सुरुवात? उर्फी नुकतीच एका येल्लो आउटफिट मध्ये दिसून आली होती. त्या आउटफिटचे फोटो चाहतने शेअर करत सोशल मीडियावर लिहिलं, “हे असे कपडे कोण घालतं? ते ही रस्त्यावर? म्हणजे कोणीही कपडे काढून फिरेल आणि त्याला जनता सेलिब्रेटी बनवेल? भारतीय मीडिया एवढी चीप आणि खालच्या दर्जाची आहे? या चीप पब्लिसिटी आणि मीडियाला विकत घेणं सोपं आहे. हा असा चीप फॅशन शो आपण पुढच्या पिढीला प्रमोट करत आहोत. कोणीही एखाद्या स्पॉटसाठी पैसे देईल किंवा अगदी नग्न सुद्धा होईल म्हणून तुम्ही त्याला दाखवणार आहात का? हे अगदी दुःखद आहे. देव तुम्हाला सद्बुद्धी देवो.”
चाहत खन्नाची इन्स्टाग्राम स्टोरी
उर्फीचा चाहतवर पलटवार चाहतने उर्फीवर केलेल्या कमेंटनंतर उर्फी सुद्धा शांत बसली नाही. तर तिने असं लिहिलं, “कमीत कमी मी माझे फॉलोअर्स तरी विकत घेतले नाहीत. आणि बोलण्याआधी थोडा होमवर्क करून या म्हणजे समजेल की मी तिथे एका मुलाखतीसाठी गेलेले. मी मुलाखतीसाठी असे कपडे परिधान केले होते. त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नसावं. तुम्हाला फक्त या गोष्टीने जळफळाट होतो की पापाराझी पैसे देऊनही तुम्हाला कव्हर करत नाहीत. चाहत खन्ना या जगात कोणताही व्यक्त काही करेल याच्याशी तुमच्याशी काही मतलब नाही. तुम्ही हीच स्टोरी रणवीर सिंगसाठी का शेअर नाही केली? यातून तुमची हिपोक्रसी दिसते. हे बघा मी ना तुम्हाला तुमच्या दोन घटस्फोटांवरून जज केलं ना वयापेक्षा लहान मुलांना डेट करण्याबद्दल. मग तुम्ही मला का जज करत आहात ?” तसंच उर्फीने चाहतचा एक बॅकलेस फोटोशूटमधील फोटो शेअर करत एक मोठं वक्तव्य केलं, “हे सगळं सोशल मीडियावर शेअर करणं बरोबर आहे? कमीत कमी मी माझे पैसे स्वतः कमावते, स्वतःच्या दोन नवऱ्यांनी दिलेल्या पोटगीवर जगत नाही. चाहत खन्ना मी तुझ्याकडे विचारायला आले नाही की तू तुझं आयुष्य कसं जगतेस. मला कळत नाही या काकूंना माझ्याबद्दल काय समस्या आहे?”
उर्फी जावेदची इन्स्टाग्राम स्टोरी
उर्फी जावेदची इन्स्टाग्राम स्टोरी
चाहतने सुद्धा दिलं सडेतोड उत्तर “मला अशाप्रकारे या ड्रामाचा भाग बनायचं नाही पण मी माझ्या फॉलोअर्सना सांगू इच्छिते की काही लोकं बोलतात आणि काही जण भुंकतात. पण जे मला ओळखतात त्यांना माहित आहे की मी या जागी पोहोचायला किती मेहनत घेतली आहे. ही लाईफस्टाईल पोटगीच्या पैशाने नाही तर मेहनतीच्या कमाईने कामवाली आहे. बोलण्याआधी रेकॉर्ड चेक करावे. मी कोणाकडून एक पैसाही घेतलेला नाही. मला माहित आहे की माझ्या घटस्फोटांवर निशाणा साधणं अगदी सोपा पर्याय आहे. ज्या लोकांकडे क्लास आहे ते असं कृत्य करणार नाहीत. पण जे मुळातच क्लासलेस आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? ही महिला किती विनोदी आहे. मी हिच्यावर का जळेन? पहिले माझ्यापेक्षा अर्धे फॉलोअर्स मिळवून दाखव. आणि ही बाई स्वतःची रणवीर सिंगशी तुलना करते पहिले त्याच्या अर्ध काम करून दाखव. त्याने कोणासाठी तरी हे शूट केलं आहे. तो असा रस्त्यावर न्यूड होऊन फिरत नाही किंवा पेड स्पॉटिंग करत नाही. आणि अपघाताने त्याने तुम्हला फॅशन आयकॉन म्हणून टाकलं याचा रथ त्यांच्यासारखी तू फॅशन आयकॉन होत नाहीस. ओम शांती”