JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi च्या चावडवीर येणार स्पेशल गेस्ट; स्पर्धक थिरकणार त्याच्या तालावर, पाहा video

Bigg Boss Marathi च्या चावडवीर येणार स्पेशल गेस्ट; स्पर्धक थिरकणार त्याच्या तालावर, पाहा video

बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. आज चावडवीर एख स्पेशल गेस्ट येणार आहे. विशेष म्हणजे हा गेस्ट स्पर्धकांना त्याच्या तालावर थिरकायला लावणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 डिसेंबर- बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन (Bigg Boss Marathi) पहिल्या दोन सीजन एतकाच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला यशस्वी ठरला आहे. आता शो संपायला काहीच दिवस उरले आहेत. अशातच सर्व स्पर्धक ट्रॉपीच्या जवळ जाण्यासाठी ती जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. आज चावडवीर एख स्पेशल गेस्ट येणार आहे. विशेष म्हणजे हा गेस्ट स्पर्धकांना त्याच्या तालावर थिरकायला लावणार आहे. हा गेस्ट म्हणजे दुसरा तिसरा कोण नसून लोकप्रिय मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा या भागाचा एक प्रोमो आऊट झाला आहे. यामध्ये महेश मांजरेकर यांच्यासोबत चावडीवर अभिनेता अंकुश चौधरी देखील दिसत आहे. अंकुशने यावेळी स्पर्धकांसोबत गप्पा मारल्या व काही गेम्स देखील खेळल्यात. यावेळी त्याने स्पर्धकांना त्याच्या ये गो ये मैण..या गाण्यावर डान्स करायला सांगितला. यावेळी सर्वांनी त्याच्या गाण्यावर ठेका धरला. आजच्या भागात घरातून कोण बाहेर पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. वाचा- जयदीप -गौरीच्या सुखी संसरात मिठाचा खडा; या अभिनेत्रीची होणार एंट्री बिग बॉस मराठीचा हा तिसरा सीजन आता अधिक रंजक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या शोचा ग्रँड फिनाले फक्त एक आठवडा दूर आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फिनालेमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडताना दिसत आहे. दरम्यान विशाल निकम हा मराठी बिग बॉसचा पहिला फायनलिस्ट ठरला आहे.

संबंधित बातम्या

मागच्या आठवड्यात चावडीवर सिद्धार्थ जाधव दिसला होता. आज पुन्हा अंकुश चौधरी दिसणार आहे. अंकुशला चावडवीर पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या