मुंबई, 20 मार्च: रेमो डिसुझा (Remo D’Souza) सध्या डान्स रिअॅलिटी शो ‘डीआयडी लिटिल मास्टर सीझन 5’ मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान या रेमोने त्यातील एका स्पर्धकाला मोठ्या मनाने मदत केली. आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क करणाऱ्या 8 वर्षीय हिमांशूचे कर्ज फेडण्यासाठी रेमोने पुढाकार घेतला आहे. रेमो या हिमांशूच्या कामगिरीने प्रभावित झाला होता. पण हिमांशूच्या आईने त्याच्या संगोपनासाठी किती त्रास सहन केला हे जाणून घेतल्यानंतर रेमो फार भावुक झाल्याचे दिसून आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेटवर रेमो खूप भावूक झाला होता. हिमांशू हा मूळचा दिल्लीचा असून, त्याने लहान वयातच वडील गमावले होते आणि त्याच्या आईनेच त्याचे संगोपन केले. हिमांशूच्या आईने रिक्षा खरेदी करण्यासाठी घेतलं होतं कर्ज हिमांशूच्या आईने तिच्या 2 मुलांना सिंगल मदर म्हणून वाढवले. मुलांना वाढवण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आईने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली होती. मात्र रिक्षा घेण्यासाठी त्यांना मोठे कर्ज घ्यावे लागले. त्यांच्यासमोर आणखी एक संकट होतं ते म्हणजे, रिक्षा चालवल्या लागल्यानंतर अनेकदा लोकं त्यांना रस्त्यावर त्रास देखील देत असत. हे वाचा- Baby Bump फ्लाँट करताना भारती सिंहचं रोमँटिक फोटोशूट, चाहते म्हणाले- फारच Cute! रेमोने केली मोठी मदत हिमांशूच्या कुटुंबीयांचं ही समस्या पाहून रेमोने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रेमो म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या रिक्षासाठी पैसे देत असलेल्या EMI देऊन मला तुम्हाला मदत करायची आहे. रिक्षासाठी अजून किती रक्कम द्यावी लागेल ते सांगा. मी त्यासाठी पैसे देईन.’ रेमो डिसुझा पुढे म्हणाला होता, ‘तुम्ही किंवा हिमांशूने आता याबाबत टेन्शन घ्यावं असं मला वाटत नाही. आता ही रिक्षा तुमची आहे. आता तुमच्या मुलांवर लक्ष केंद्रित करा आणि आनंदी जीवन जगा.’ कोरिओग्राफर, डान्सर आणि दिग्दर्शक रेमो डिसुझा (Remo D’Souza) डान्स रिअॅलिटी शो ‘डीआयडी लिटिल मास्टर सीझन 5’ (DID L’il Master 5) मध्ये सोनाली बेंद्रे आणि मौनी रॉय यांच्यासह जजच्या भूमिकेत आहे.