JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ कॉल

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ कॉल

तिच्या व्हॉट्सअपवरून करिश्‍मा तन्ना, तान्‍या शर्मा आणि अशा अनेक सेलिब्रिटींना व्हिडीओ कॉल गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 नोव्हेंबर- आतापर्यंत अनेक बड्या सेलिब्रिटींचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यात फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या अकाउंटची संख्या जास्त असते. पण पहिल्यांदा असं काही तुम्ही ऐकत असाल ज्यात सेलिब्रिटीचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं. टीव्ही अभिनेत्री तेस्वी प्रकाशचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं आहे. तेजस्वीच्या मते, हॅकरने तिच्या अकाउंटवरून अनेकांना अश्लील व्हिडीओ कॉल केले. स्पॉटबॉयला दिलेल्या वृत्तात तेजस्वी प्रकाश म्हणाली की, ‘ज्या व्यक्तीने माझं व्हॉट्सअप अकाउंट हॅक केलं, तो माझ्या फोनमधील कॉन्टॅक्टशी अतिशय मैत्रीपूर्ण चॅट करत आहे आणि एवढंच नाही तर एक लिंकही शेअर करत आहे. यात तो समोरच्या व्यक्तीला आलेला एक कोडही मागत आहे. माझ्या कॉन्टॅक्टमधील एखाद्या व्यक्तीने त्याला हा कोड दिला तर तो लगेच व्हिडीओ कॉल करतो. जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ कॉल उचलता तेव्हा त्या व्यक्तीचं अश्लील रूप तुमच्या समोर येतं.’ तेजस्वी म्हणाली की, ‘काल मी मीरा रोड इथे एक विशेष भागाच्या चित्रीकरणात व्यग्र होती. तेव्हा मला एक व्हिडीओ कॉल आला. तेव्हा माझ्या आसपास अनेक लोकं होती. मी तो व्हिडीओ कॉल उचलला तेव्हा माझ्यासमोर एक नग्न माणूस आला.’ अशाच प्रकारची घटना याआधी अनेकांसोबत घडली आहे. तेजस्वी म्हणाली की, तिच्या व्हॉट्सअपवरून करिश्‍मा तन्ना, तान्‍या शर्मा आणि अशा अनेक सेलिब्रिटींना व्हिडीओ कॉल गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

तेजस्वीने या संबंधी सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास सांगितली. अजूनपर्यंत तेजस्वीने कोणतीही तक्रार केली नसून ती लवकरच पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं तिने सांगितलं. तिच्यासोबतच कर्ण संगिनी मालिकेतील तिचा सहकलाकार आशिम गुलाटीचंही व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालं आहे. दिल्लीच्या प्रदूषणावर प्रियांका चोप्राची रिअॅक्शन,‘इथं राहणं म्हणजे…’ Happy Birthday Tabu: तब्बू अजूनही आहे सिंगल, जाणून घ्या लग्न न करण्याचं कारण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या