JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; 'त्या' प्रकरणामुळे पतीने घेतली कोर्टात धाव

श्वेता तिवारीच्या अडचणीत वाढ; 'त्या' प्रकरणामुळे पतीने घेतली कोर्टात धाव

श्वेताचा आणि पती अभिनव कोहलीमध्ये मुलगा रेयांशसाठी वाद सुरु आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जुलै- छोट्या पडद्यावरील (Tv Actress)  प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari)आणि तिच्या पतीतील वाद वाढतच चालला आहे. या दोघांमध्ये मुलगा रेयांशसाठी वाद सुरु आहे. श्वेताचा पती अभिनेता अभिनव कोहलीने (Abhinav Kohali) आरोप करत म्हटलं होतं, की श्वेता त्याला त्याच्या मुलाला भेटू देत नाही. त्यानंतर आत्ता अभिनव कोहलीने अभिनेत्री श्वेता तिवारीची अंतर्गत जामीन रद्द व्हावी यासाठी चक्क कोर्ट गाठलं आहे. पाहूया काय आहे, हे नेमकं प्रकरण,

संबंधित बातम्या

टाइम्सऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनव कोहलीच्या वकीलाने म्हटलं आहे, ‘श्वेता तिवारी कोर्टाला न सांगता आणि परवानगी न घेता, ‘खतरों के खिलाडी’ च्या शुटींगसाठी साउथ आफ्रिकेला गेली होती. त्यामुळे आम्ही कोर्टात याचिका दाखल केली होती. आणि आत्ता श्वेताला याबद्दल जबाब द्यावा लागेल. अभिनेता अभिनव कोहली मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टामध्ये केस लढत आहे. बुधवारी या केसची सुनावनी आहे. (हे वाचा: VIDEO: ‘लिटल चॅम्प’ फेम स्वरा जोशीची आई आहे ‘ही’ प्रसिद्ध गायिका   ) अभिनेत्री श्वेता तिवारी गेली दीड महिना साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये होती. येथे ती ‘खतरों के खिलाडी’ या टीव्ही शोचं शुटींग करत होती. शुटींग संपवून नुकताच ती भारतात परतली आहे. म्हणूनचं पती अभिनव कोहलीने तिच्यावर आपल्या मुलाला घरी एकट सोडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर श्वेता तिवारीने एक व्हिडीओ शेयर केला होता. त्यामध्ये अभिनव रेयांशला तिच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. या व्हिडीओनंतर अभिनवची सोशल मीडियावर बरीच निंदा करण्यात आली होती. माध्यमांच्या माहितीनुसार पहिल्यांदा सन 2019 मध्ये श्वेता तिवारी आणि अभिनव कोहलीमधील हा वाद सर्वांसमोर आला होता. यावेळी श्वेताने आपली मुलगी पलक तिवारीसोबत मिळून अभिनवविरुद्ध कौटुंबिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या