JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्माची BB OTTमध्ये होणार तुफानी एन्ट्री

टीव्हीची बोल्ड क्वीन निया शर्माची BB OTTमध्ये होणार तुफानी एन्ट्री

अभिनेत्री निया शर्माने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑगस्ट- ‘बिग बॉस OTT’(Bigg Boss OTT)  सध्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. दररोज शोमध्ये नवनवीन ट्वीस्ट पाहायला मिळतात. नुकताच संडे का वारमध्ये होस्ट करण जोहरने या आठवड्यात कोणतही एलीमीनेशन होणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे स्पर्धक खुपचं आनंदी झाले होते. मात्र त्याचबरोबर करणने अजून एका गोष्टीची हिंट दिली होती. आणि ती म्हणजे वाईल्ड कार्ड एन्ट्री. या आठवड्यात BB च्या घरात नवा पाहुणा येऊ शकतो अशी चाहूल करणने दिली होती. आत्ता या वाईल्ड कार्ड (Wild Card Entry) स्पर्धकाचं नाव स्पष्ट झालं आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा(Nia Sharma) शोची स्पर्धक बनून येणार आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री निया शर्माने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. नुकताच नियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये ती मजेशीर पोझ देताना दिसत आहे. सोबत तिनं या फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘चला काही तुफानी करूया, बिग बॉस OTT 1 सप्टेंबर’. त्यामुळे आत्ता स्पष्ट झालं आहे, की ती वाईल्ड कार्ड एन्ट्री दुसरी कोणी नसून छोट्या पडद्यावरील बोल्ड क्वीन निया शर्माचं आहे. (हे वाचा:  रेड ड्रेसमध्ये निया शर्माचा किलर LOOK; बोल्डनेसने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान ) निया शर्माला टीव्हीची सर्वात बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आत्ता बिग बॉस OTT मध्ये निया कशा पद्धतीने चाहत्यांचं मनोरंजन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बिग बॉस OTT मध्ये सध्या अनेक ट्वीस्ट आणि टर्नस येत आहेत. स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नुकताच BB च्या घरात स्पर्धक जीशान खानला घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्याने प्रतिक सहेजपाल आणि निशांत भट्टसोबत मारामारी केली होती. त्यामुळे दंड स्वरुपात त्याला घरातून बाहेर काढण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या