मुंबई, 26 मे : सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 13 ची स्पर्धक देवोलिना भट्टाचार्जी सध्या खूप चर्चेत आहे. लॉकडाऊन सुरू असतानाच देवोलिना कायदेशीर कारवाईमध्ये फसल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही अभिनेता आणि ‘मुझसे शादी करोगे’ रिअलीटी शोचा स्पर्धक मयुर वर्मानं देवोलिनाच्या विरोधात सायबर क्राइमची तक्रार दाखल केली आहे. मयुरनं आरोप केला आहे की देवोलिना त्याची प्रतिमा खराब करण्याचा आणि त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे. मयुरनं ट्वीटरवरून याची माहिती दिली. सोशल मीडियावर हे वॉर तेव्हा सुरू झालं होतं जेव्हा सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाझ गिल यांचं ‘भूला दुँगा’ हे गाणं रिलीज झालं होतं. देवोलिनानं त्यावेळी सोशल मीडियावर या गाण्याची खिल्ली उडवली होती. ज्यावरून मयुर आणि देवोलिनामध्ये वाद झाले होते. यानंतर मयुरनं देवोलिनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, अभिनेते गिरीश साळवी यांचे निधन
मयुरनं तक्रारीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला एक कॅप्शन दिलं. ज्यात त्यानं लिहिलं, काही गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या होत्या. त्यामुळे आता मला सायबर क्रामइची मदत घ्यावी लागत आहे. आता सर्व त्यांच्या हातात आहे. मला विश्वास आहे की ते लवकरात लवकरत या प्रकरणावर कारवाई करतील.
दुसरीकडे देवोलिनाननं मयुरच्या या तक्रारीला एक पब्लिसिटी स्टंट म्हटलं होतं. ती म्हणाली, मी कोणत्याही मयुर वर्माला ओळखत नाही. मला माहित नाही तो माझं नाव का घेत आहे. हा एक पब्लिसिटी स्टंट असू शकतो. अशा गोष्टींकडे मी फारशी लक्ष देत नाही. मी या व्यक्तीला ओळखत सुद्धा नाही आणि मला त्याची तक्रार सुद्धा माहित नाही. करण जोहर यांच्या घरातही कोरोनाने केला प्रवेश, दोन कर्मचारी पॉझिटिव्ह मयुर वर्मा आणि शहनाझ गिल एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ‘मुझसे शादी करोगे’ या रिअलिटी शोमध्ये या दोघांच्या मैत्रीची खूप चर्चाही झाली होती. त्यानं या शोमध्ये शहनाझला इंप्रेस केलं होतं मात्र तेव्हाही तो कधी पारस तर कधी देवोलिनाच्या निशाण्यावर होता. मयुरच्या या ट्वीट नंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचं समर्थन केलं आहे. तू जे केलंस ते ठिकच केलंस अशा प्रतिक्रिया त्यांच्या ट्वीटरवर पाहायला मिळत आहेत. 71 वर्षीय लावणी सम्राज्ञी माया जाधव 15 मांजरींसह आहेत लॉकडाऊन, मदतही मिळेना